विराट आता इज्जतीचा प्रश्न आहे…; भारत- पाकिस्तान सामन्यापूर्वी अभिनेत्रीने केले आवाहन

| Updated on: Feb 22, 2025 | 12:52 PM

सोशल मीडियावर या अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री दुबईत होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील भारत-पाकिस्तान सामन्याविषयी बोलत आहे.

विराट आता इज्जतीचा प्रश्न आहे...; भारत- पाकिस्तान सामन्यापूर्वी अभिनेत्रीने केले आवाहन
virat kohli
Image Credit source: Instagram
Follow us on

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना उद्या म्हणजे २३ फेब्रुवारी रंगणार आहे. दुबईमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (DICS) हा सामना होणार आहे. या सामान्याची उत्सुकता भारतीयांमध्ये पाहायला मिळते. काही क्रिकेटप्रेमी हा सामना पाहण्यासाठी दुबईला पोहोचले आहेत. दुबईतील एकदिवसीय सामन्यातील दोन्ही संघांचे आतापर्यंतचे रेकॉर्ड पाहिले तर भारताने पाकिस्तानला पछाडल्याचे चित्र आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात नेमकं काय होणार हे पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. दरम्यान, एका अभिनेत्रीने विराट कोहलीला आवाहन केले आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दुसऱ्या मॅचमध्ये भारताने बांग्लादेशला हरवले आहे. आता २३ फेब्रुवारीला भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. अभिनेत्री राखी सावंतने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती भारताला पाठिंबा देताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये राखी सावंतसोबत तिचा पूर्वपती रितेश देखील दिसत आहे. दोघेही भारताला पाठिंबा देत आहेत. राखी आणि रितेशसोबत पाकिस्तानचे समर्थन करणारे लोकही उपस्थित होते. राखी म्हणते, ‘विराटचा परफॉरमन्स पाहिला आहे.’ त्यावर शेजारी उभी असलेली व्यक्ती म्हणते ‘विराट १७-१८ रन्सवर आऊट होईल.’ नंतर रितेश म्हणतो की, ‘राखीचे हृदय भारताशी जोडले गेले आहे. विराट खूप पुढे जाईल.’ त्यावर उत्तर देत राखी म्हणते की, ‘तू किमान धावा तरी कर… आम्ही लगेच अशी विकेट घेऊ ना.. विराट आता इज्जतीचा सवाल आहे. हे लोक आता हसत आहेत रात्री रडतील.’

हे सुद्धा वाचा

राखी सावंत सध्या दुबईत असून तिथून भारताला सपोर्ट करताना दिसत आहे. राखी सावंतसोबत तिचा पहिला पती रितेशही दिसत आहे. हा तोच रितेश आहे ज्याला राखीने अनेक वर्षे लपवून ठेवले होते आणि बिग बॉसच्या घरात सर्वांसमोर आणले होते. मात्र, शोमधून बाहेर येताच त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्याही समोर आल्या. त्यानंतर राखीने दुसरे लग्न केले आणि तिचे दुसरे लग्नही फार काळ टिकले नाही. राखी तिच्या व्हिडीओमध्ये पाकिस्तानला सामन्यात पराभूत करण्याबद्दल बोलताना दिसत आहे.