रणबीर कपूरने रिलेशनशिपसाठी मित्राला दिला होता सल्ला, पण त्याचं नातं तुटलं…

| Updated on: May 16, 2023 | 12:30 PM

रणबीर कपूर त्याच्या रिलेशनशिपमुळे खूप चर्चेत होता. त्याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले. अभिनेत्याने आपल्या मित्राला नात्याबाबत सल्ला देण्याची गोष्ट शेअर केली आहे.

रणबीर कपूरने रिलेशनशिपसाठी मित्राला दिला होता सल्ला, पण त्याचं नातं तुटलं...
Image Credit source: tv9
Follow us on

Ranbir Kapoor : रणबीर कपूर सध्या त्याची मुलगी राहासोबत वेळ घालवत आहे. नुकताच त्याचा ‘तू झुठी मैं मक्कार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. ज्याने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजचे प्रमोशन करताना रणबीरने (Ranbir Kapoor) त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितले. या चित्रपटात रणबीरचा साईड बिझनेस रिलेशनशिप तोडण्याचा आहे. दरम्यान, जेव्हा त्याला त्याच्या खऱ्या आयुष्यात याबाबत प्रश्न विचारण्यात आला. रणबीरने मित्राला त्याच्या खऱ्या आयुष्यात नाते तोडण्यास मदत केली होती, त्याबद्दल स्वत: रणबीरनेच सांगितले.

शाळेतील मित्रांना दिला सल्ला

एका मुलाखतीत, जेव्हा रणबीरला विचारण्यात आले की, तू झुठी मैं मक्करमधील मिकीच्या भूमिकेसारखे त्याने वास्तविक जीवनात काही केले आहे का, तेव्हा अभिनेता म्हणाला की तो शाळेत त्याच्या मित्रांना सल्ला देत असे. रणबीर म्हणाला, ” शाळेतील काही मित्रांना रिलेशनशिपमधून बाहेर पडायचे होते, म्हणून मी त्यांना सल्ला दिला होता, असे रणबीरने नमूद केले. तुम्ही कोणाच्या प्रेमात नसाल किंवा एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडत असाल तर , दोन्ही बाबातीत तुम्ही प्रामाणिक राहिलं पाहिजे, असंही रणबीर म्हणाला. चित्रपटातील मिकीसारखे काही आहे का असं विचारलं तर मी सांगेन की असं काही नसतं. खरं आयुष्य खूप कठीण असतं.

नात्यात कसा होता रणबीर ?

यापूर्वी रणबीर करीना कपूर खानच्या चॅट शोमध्ये पोहोचला होता. जिथे करीनाने त्याला विचारले की तू कधी नात्यात फसवलं आहेस का? ज्यावर रणबीर म्हणाला की “मी हे (फसवणूक) केले आहे, परंतु जसजसे तुम्ही मोठे होत जाता, तसतसे तुम्हाला हे समजते की तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत जितके प्रामाणिक आणि खुले राहाल तितके नाते अधिक सखोल आणि अर्थपूर्ण होईल.”