मुंबई : बॉलिवूड सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. अशा कलाकारांचं नाव जरी घेतलं तरी त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी होत असते. अशाच कलाकारांपैकी एक अभिनेत्री आज जी खूपच लोकप्रिय आहे. तिनं फक्त तिच्या अभिनयानेच नाही तर तिच्या सौंदर्यामुने देखील प्रेक्षकांना भूरळ घातली आहे. सध्या या अभिनेत्रीचा एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.
या अभिनेत्रीचा बालपणीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोतील अभिनेत्री 90 च्या काळातील एक आघाडीची अभिनेत्री आहे. लाखांहून अधिक तिचे फॉलोअर्स आहेत. तर आज आपण या क्यूट आणि हॉट अशी पर्सनॅलिटी असलेल्या अभिनेत्रीबाबत जाणून घेणार आहोत.
ही क्यूट चिमुकली बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. या फोटोत ती जितकी गोंडस दिसत आहे तितकीच ती आताही सुंदर दिसते. 90 च्या काळापासून ती चित्रपटांमध्ये काम करत असून तिच्या सौंदर्यासोबतच ती आपल्या उत्कृष्ट अभिनयाने लोकांची मने फुलवत आहे.
बॉलीवूडमधील प्रत्येक अभिनेत्रीचं एक स्वप्न असतं, ते म्हणजे सलमान, शाहरुख आणि आमिर या तीन खानसोबत काम करण्याचं. प्रत्येक अभिनेत्रीला या तिघांसोबत एकदा स्क्रिन शेअर करण्याची संधी मिळावी असं वाटतंच. तसंच या फोटोतील मुलीने या तीन अभिनेत्यांसह काम करत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.
1997 मध्ये या अभिनेत्रीने ‘राजा की आयेगी बारात’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. पण तिले खरी ओळख 1998 मध्ये आलेल्या शाहरुख खानच्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातून मिळाली. आपण आता ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत होती आणि तिची ही भूमिका खूपच गाजली होती. यानंतर तिनं अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
यशराज फिल्मशी खास कनेक्शन!
या अभिनेत्रीचं यशराज फिल्म्सशी विशेष नातं आहे. तिनं 2014 मध्ये YRF प्रमुख आदित्य चोप्रासोबत लग्न केले. आता तुम्हाला नक्कीच समजलं असेल की ती दुसरी तीसरी कोणी नसून राणी मुखर्जी आहे.