राशा थडानीसाठी श्रीलीलाचा पत्ता कट; या चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत राशा करणार रोमान्स

| Updated on: Mar 28, 2025 | 5:49 PM

कार्तिक आर्यन चित्रपटात श्रीलीलाची जागा रशा थडानी घेणार असल्याचं म्हटलं जातं आहे. रिपोर्ट्सनुसार, राशाने श्रीलीलाची जागा घेतल्याचं म्हटलं जात आहे. त्यानमुळे आता आगामी चित्रपटात कार्तिकसोबत श्रीलीलाऐवजी राशा रोमान्स करताना दिसणार असं म्हणायला हरकत नाही.

राशा थडानीसाठी श्रीलीलाचा पत्ता कट; या चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत राशा करणार रोमान्स
Rasha Thadani replaced Sreeleela
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बॉलिवूडमध्ये अनेक स्टारकिडस् आता एन्ट्री घेत आहेत. आपलं नशीब आजमवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात सैफ अली खानच्या मुलापासून ते शाहरूख खानच्या मुलापर्यंत. सगळेच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण यात आत एक नाव अॅड झालं आहे ते म्हणजे रवीनाची लेक राशा थडानी.

पहिल्याच चित्रपटानंतर राशा बनली सर्वांची पसंती 

अभिनेत्री राशा थडानीने नुकतेच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं आहे. पहिल्याच चित्रपटानंतर ती निर्मात्यांची पसंती बनत असल्याचं दिसून येत आहे. या अभिनेत्रीने आझाद चित्रपटातील तिच्या नृत्याने सर्वांना वेड लावले होतं. आता बातमी येत आहे की ती कार्तिक आर्यनसोबत एक चित्रपट करणार आहे. कार्तिक आर्यन आणि भूमी पेडणेकर यांच्या चित्रपटात राशा थडानी महत्त्वाची भूमिका साकारू शकते. जर असे झाले तर ती अभिनेत्री श्रीलीलाची जागा घेईल.

चित्रपटात राशासाठी श्रीलीला रिप्लेस 

कार्तिक आर्यन सध्या अनुराग बासूच्या श्रीलीलासोबतच्या एका रोमँटिक चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. ज्याचा पहिला लूक आधीच प्रदर्शित झाला आहे. कार्तिक भूमी पेडणेकरसोबत ‘पति पत्नी और वो 2’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटावर सध्या काम सुरु आहे. आता बातमी आली आहे की निर्मात्यांनी या चित्रपटात श्रीलीलाला कास्ट करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र आता त्यांना राशाला निवडण्यात आलं असल्याचं म्हटलं जात आहे.


कार्तिक आर्यनसोबत आता राशाची जोडी

कार्तिक आर्यनसोबत आता राशाची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. ‘पती पत्नी और वो’ भाग 2 मध्ये आता श्रीलीलाची जागा राशा थडानी घेऊ शकते असं म्हटलं जात आहे. तिच्या लोकप्रियतेमुळे, आता कार्तिक आर्यनचा पुढील चित्रपट ‘पती पत्नी और वो 2’ साठी राशाचा विचार केला जात आहे. मुदस्सर अझीझ दिग्दर्शित चित्रपटात राशा श्रीलीलाची जागा घेऊ शकते.

‘पती पत्नी और वो’ या चित्रपटाबद्दल बोलायचे झालं तर, हा कार्तिक आर्यन-भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे यांचं त्रिकूट असलेला एक रोमँटिक-कॉमेडी चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता.  आता याचा दुसरा भागही येणार आहे.