‘पुष्पा 2’च्या छप्परफाड कमाईमुळे रविना टंडनच्या नवऱ्याचे नशीब जोरावर; हाती बक्कळ पैसा

| Updated on: Dec 14, 2024 | 7:13 PM

अल्लू अर्जुनच्या "पुष्पा 2: द रूल"ने केवळ आठ दिवसांत 1067 कोटींची कमाई करून सर्व विक्रम मोडले आहेत. या यशामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांसह अनेकांना प्रचंड फायदा झाला आहे. यात रवीना टंडनचे पती अनिल थडानी यांनाही 'पुष्पा 2' च्या कमाईमुळे जणू लॉटरी लागली आहे.

पुष्पा 2च्या छप्परफाड कमाईमुळे रविना टंडनच्या नवऱ्याचे नशीब जोरावर; हाती बक्कळ पैसा
Follow us on

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ नं बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. आठवडाभरानंतरही चित्रपट थिएटरमध्ये हाऊसफूलमध्येच चालत आहे. 8 दिवसांत सर्व दिग्गजांचे रेकॉर्ड तोडत चित्रपटानं 1000 कोटींहून अधिक कमाई केली.यामुळे अर्थातच चित्रपटातील सर्वच कलाकार , चित्रपटाची टीम सर्वांनाच आनंद आणि फायदा झाला आहे. यामध्ये रवीना टंडनच्या नवऱ्याचंही नाव आहे.

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2: द रूल’नं रिलीजच्या केवळ आठच दिवसांत सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटानं जगभरात तब्बल 1067 कोटींचा गल्ला जमवला. अल्लू अर्जुनच्या चित्रपटानं भांडवल तर पहिल्या पाचच दिवसांत वसूल केलं होतं. अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक करण्यापूर्वी त्याने दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला होता.  अल्लू अर्जुननं सर्वांचे आभार मानले, यावेळी डिस्ट्रीब्यूटर्सपासून एग्जीबिटर्सपर्यंत अनेकजण प्रेसमीटसाठी उपस्थित होते.

या पत्रकार परिषदेत रविना टंडनचे पती उपस्थित होते. पुष्पा 2 च्या बक्कळ कमाईमुळे फक्त निर्मातेच नाहीतर अनेकांना फायदा झाला आहे. ‘पुष्पा 2’च्या कामाईमुळे रविना टंडनच्या पतीला बक्कळ पैसा मिळाला आहे.

पुष्पाच्या कमाईमुळे रविना टंडनचा पती मालामाल

रवीना टंडनचा पती अनिल थडानी यांचं नाव देशातील सर्वात मोठ्या चित्रपट वितरकांमध्ये घेतलं जातं. ते एए फिल्म्सचे मालक आहेत, ज्यानं ‘पुष्पा 2’ चं नॉर्थ इंडिया थिएट्रिकल राइट्स विकत घेतले होते. म्हणजे उत्तर भारतात ‘पुष्पा 2’ रिलीज करण्याचे सर्व हक्क त्यांनी विक्रमी किमतींत विकत घेतले होते. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, ही किंमत 200 कोटी रुपये होती.

‘पुष्पा 2’ ला रिलीजआधीच जो प्रतिसाद मिळत होता त्यावरून या चित्रपटात पैसे गुंतवून अनिल थडानी यांना त्याचा फायदा होणार होता हे स्पष्ट होतं. अशा परिस्थितीत त्यांनी आगाऊ तत्त्वावर इतके महागडे हक्क खरेदी केले होते. आजपर्यंत कोणत्याही चित्रपटाचे हक्क इतक्या महागात विकले गेले नव्हते असही म्हटलं जात आहे.

दरम्यान अनिल थडानी यांनी याबद्दल त्यांची प्रतिक्रियाही दिली होती. ते म्हणाले होते “या चित्रपटानं इतके मोठे विक्रम मोडीत काढल्याचं आश्चर्य वाटतं. अल्लू अर्जुन आणि सुकुमार यांच्या मेहनतीमुळे हे सर्व शक्य झालं आहे. मी या चित्रपटाचा एक हिस्सा आहे, यासाठी मी निर्मात्यांचे आभार मानतो. लोकांचं प्रेम असंच कायम राहो आणि चित्रपटानं 2000 कोटींची कमाई करावी, ही सदिच्छा” अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

अनिल थडानी यांना नेमका काय फायदा झाला?

अनिल थडानी यांची एए फिल्म्स दरवर्षी उत्तर भारतात अनेक चित्रपटांचं वितरण करते. यात केवळ बॉलिवूडच नाही तर साऊथच्या अनेक मोठ्या चित्रपटांचा समावेश आहे. आता हिंदी कलेक्शन बघितलं तर या चित्रपटानं सर्वांनाच प्रभावित केलं आहे. एकट्या हिंदीतून एकूण 425.6 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. आता वीकेंडला पुन्हा कलेक्शन वाढेल, त्यामुळे 500 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. या चित्रपटानंतर अनिल थडानी यांनी नफा तर मिळवलाच, पण भविष्यात अनेक मोठे चित्रपटांचे कलेक्शनही पदरात पाडून घेतले आहे.