‘ब्लॅक, फॅट आणि स्लट’ची कमेंट, रेखाने स्वतःमध्ये केला मोठा बदल, पुढे त्याच अभिनेत्याने…

| Updated on: May 15, 2024 | 6:47 PM

स्वतःमध्ये प्रतिभा असेल तर यशाची उंची गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही याचाच प्रत्यय त्या अभिनेत्रीने आणून दिला. त्या अभिनेत्रीने त्या कमेंटनंतर आपल्यात खूप मोठा बदल घडवून आणला. स्वत:मध्ये तिने अशी सुधारणा केली की अभिनेत्यालाही आश्चर्य वाटले.

ब्लॅक, फॅट आणि स्लटची कमेंट, रेखाने स्वतःमध्ये केला मोठा बदल, पुढे त्याच अभिनेत्याने...
actress rekha
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

मुंबई : 1970 चे ते वर्ष. बॉलीवूडमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देणारा एक गोरा, गुबगुबीत हिरो गाजत होता. याच काळात अभिनेता नवीन निश्चल याचा एक नवीन चित्रपट येत होता. त्या चित्रपटात साऊथच्या एका अभिनेत्रीने काम केले होते. चित्रपट रिलीज होण्यापूर्वी त्याचा प्रीमियर शो आयोजित केला गेला होता. इंडस्ट्रीतील सर्व नामांकित स्टार, अभिनेत्री त्या प्रीमियर शो ला हजर राहिले होते. त्या सर्वानाच नव्या अभिनेत्रीला पाहण्याची उत्सुकता होती. साऊथची असल्यामुळे ती अभिनेत्री कृष्णवर्णीय होती. थोडी लठ्ठ होती. ती अभिनेत्री प्रीमियर शो ला पोहोचली. तिला पाहून त्या अभिनेत्याची प्रतिक्रिया होती, ”ही मोटी, काळी बाई इंडस्ट्रीत आपली जागा कशी बनवेल?’. तो अभिनेता होता शशी कपूर. पण, पुढे त्यांनी त्याच अभिनेत्रीसोबत तब्बल 17 चित्रपटात काम केले आणि सर्वच्या सर्व हिट चित्रपट दिले.

स्वतःमध्ये प्रतिभा असेल तर यशाची उंची गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही याचाच प्रत्यय त्या अभिनेत्रीने आणून दिला. त्या अभिनेत्रीने शशी कपूर यांच्या त्या कमेंटनंतर आपल्यात खूप मोठा बदल घडवून आणला. स्वत:मध्ये तिने अशी सुधारणा केली की शशी कपूर यांना आश्चर्य वाटले आणि त्यांना निर्णय बदलण्यास भाग पाडले. ती अभिनेत्री होती बॉलिवूड सुंदरी रेखा…

‘सावन भादो’ हा नवीन निश्चल यांच्यासोबत केलेला रेखा हिचा पहिला चित्रपट. शशी कपूर यांनी रेखा यांना प्रीमिअर शो ला तिला पाहिले त्याचवेळी त्यांनी तिच्यासोबत कधीही काम न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी रेखाला पाहून ‘ब्लॅक, फॅट आणि स्लट’ अशी कमेंट केली होती. मात्र, त्यावेळी शशी कपूर यांच्यासोबत त्यांची पत्नी जेनिफर केंडल होती. जेनिफर हिला रेखाची प्रतिभा लक्षात आली आणि तिने शशीला पुढे काही बोलण्यापासून थांबवले. जेनिफर शशीला म्हणाली, ”तू बघ, ही मुलगी उत्तम अभिनेत्री बनेल’. जेनिफर हिचे हे म्हणणे पुढे खरे ठरले.

कालांतराने रेखा हिने स्वत:वर काम केले. स्वत:मध्ये इतका बदल केला, इतका सन्मान मिळविला की बॉलिवूडमधील त्यावेळचा प्रत्येक मोठा स्टार तिच्यासोबत काम करण्यास उत्सुक होता. इंडस्ट्रीतील ती सर्वात यशस्वी अभिनेत्री बनली. शशी कपूर यांनीही त्यानंतर रेखा हिच्यासोबत एक दोन नव्हे तर 17 चित्रपट केले.

1977 मध्ये शशी कपूर यांनी रेखासोबत ‘चक्कर पे चक्कर’, ‘फरिश्ता या कातील’ आणि ‘इमान धरम’ या सलग तीन चित्रपटांमध्ये काम केले. यानंतर शशी कपूर आणि रेखा 1979 मध्ये ‘सुहाग’मध्ये एकत्र दिसले. हा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. यामध्ये अमिताभ बच्चन आणि परवीन बॉबी यांच्याही मुख्य भूमिका होत्या. दुसरीकडे, शशी कपूर रेखावर इतके प्रभावित झाले की त्यांनी तिला त्यांच्या दिग्दर्शनाखाली बनवलेल्या चित्रपटांमध्ये कास्ट केले. रेखाला ‘इजाजत’, ‘विजेता’ आणि ‘उत्सव’ सारख्या चित्रपटात त्यांनी काम दिले होते.