बॉलिवूड कलाकार हे कायमच चर्चेचा विषय ठरत असतात. मग त्यांच्या खासगी आयुष्यामुळे असो वा त्यांच्या आगामी सिनेमांमुळे ते सतत चर्चेत असतात. काही काही कलाकार तर त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी देखील ओळले जातात. बॉलिवूडमधील एक अशीच अभिनेत्री आहे जी कायम तिच्या हटके शैलीसाठी ओळखली गेली. तिने एकदा तर ‘मी पवित्र नाही, वासनांनी भरलेली आहे’ असे खळबळजनक विधान केले होते. आता ही अभिनेत्री कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया तिच्याविषयी…
कोण आहे ही अभिनेत्री?
आम्ही ज्या अभिनेत्री विषयी बोलत आहोत ती बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री रेखा आहे. वयाच्या ७०व्या वर्षी देखील रेखा चर्चेचा विषय ठरत असते. रेखा ही रुपेरी पडद्यापासून लांब असली तरी ती लाइमलाइमध्ये कायम असते. आपल्या उत्कृष्ट अभिनयासोबतच बेधक स्वाभावासाठी रेखा ओळखली जाते. ती अनेकदा स्पष्ट बोलताना आणि निडर स्वभावामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडते. रेखाने एका मुलाखतीमध्ये “मी पवित्र नाही” असे खळबळजनक विधान केले होते. या विधानानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.
रेखा यांचा जन्म १९५४ साली झाली. त्यांनी वयाच्या ४व्या वर्षी तेलुगू सिनेमांमध्ये बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर वयाच्या १५व्या वर्षी त्यांनी कन्नड सिनेमांमध्ये भूमिका साकारली. त्यानंतर रेखा यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांनी बॉलिवूड सिनेमांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी सौंदर्य आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली. रेखा यांनी आजवर वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. मग त्या बोल्ड असो किंवा सोज्वळ सून.
नेमकं काय म्हणाली अभिनेत्री?
सिमी गरेवाल यांच्या एका मुलाखतीत रेखा यांनी आपल्या आयुष्याविषयी अनेक धक्कादायक गोष्टी उघड केल्या होत्या. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की त्या मद्यपान करतात का, तेव्हा त्या स्पष्टपणे म्हणाल्या, “नक्कीच मी दारू पिते आणि ड्रग्जही घेते. मी फारशी पवित्र नाही आणि वासनांनी भरलेली आहे.” त्यांचे हे विधान ऐकून सर्वांना धक्का बसला होता.