मुंबई : बॉलिवूडमधील रोमँटिक गाण्यांचा विचार केला तर, ‘आशिकी’ नावाचा चित्रपट अग्रक्रमांकावर येतो. या चित्रपटाची सगळी गाणी सुपर-डुपर हिट झाली. ही गाणी आजही लोक तितक्याच आवडीने गुणगुणतात. नदीम-श्रवण (Nadeem-Shravan) या जोडीनेच या चित्रपटाची गाणी केली होती. मात्र, श्रवण यांच्या जाण्याने आता ही जोडी तुटली आहे. श्रवण राठोड (Shravan Rathod) आता या जगात नाही. गुरुवारी (23 एप्रिल) रात्री त्यांचे निधन झाले. श्रवण यांच्या जाण्यामुळे संगीत विश्वाने एक मोठा कलाकार गमावला आहे. अक्षय कुमार, अजय देवगण, तुषार कपूर, एआर रहमान, श्रेया घोषाल, अरमान मलिक यांच्यासह अनेक कलाकार त्यांचे स्मरण करत आहेत आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत (Remembering Shravan Rathod Nadeem Shravan super hit songs).
नदीम-श्रवण या जोडीने केवळ ‘आशिकी’च नव्हे तर बर्याच चित्रपटांसाठी हिट गाणी तयार केली आहेत, ज्यांनी लोकांची प्रेमाची व्याख्या देखील बदलली. ‘धडकन’, ‘साजन’, ‘राजा हिंदुस्थानी’, ‘सडक’, ‘बरसात’, ‘फूल और कांटे’ या चित्रपटाच्या गाण्यांना जबरदस्त प्रतिसाद मिळाला. नदीम-श्रवण जोडीची ही सुपर हिट गाणी एकदा ऐकलीच पाहिजेत.
(Remembering Shravan Rathod Nadeem Shravan super hit songs)
66 वर्षीय संगीतकार असलेल्या श्रवण राठोड यांना माहीमच्या एसएल रहेजा रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी त्यांना आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली ठेवले होते. शेवटच्या दिवसांत ते व्हेंटिलेटरवर होते. श्रवण हे मधुमेहग्रस्त होते आणि त्यातच त्यांच्या फुफ्फुसांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे हृदयाची गती मंदावली होती. तसेच अनेक आजारांनाही डोकं वर काढलं होतं. त्यांच्यावर मुंबईतील माहीममधील रुग्णालयात उपचारही सुरू होते, परंतु उपचारादरम्यान आज त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचं निधन झालं.
(Remembering Shravan Rathod Nadeem Shravan super hit songs)
‘नदीम-श्रवण’ फेम श्रवण राठोड कालवश, दहा लाखांचे बिल थकल्याने पार्थिव मिळण्यास विलंब
‘तुझ्या पप्पांना काही होऊ देणार नाही, 1 तासात व्हेंटिलेटर मिळेल’, सोनू सूद पुन्हा मदतीला धावला
PHOTO | घरीच राहून सोनाक्षी सिन्हाने घटवले वजन, ट्रांसफॉर्मेशन पाहून चाहतेही झाले चकित!
Video | ‘रॉकस्टार आशाताई’, हृतिक रोशनच्या गाण्यावर आशा भोसलेंनी धरला ठेका! पाहा व्हिडीओ
ज्येष्ठ बॉलिवूड संगीतकार श्रवण राठोड यांचं निधन#ShravanRathod #VeteranBollywoodmusician https://t.co/SwP22x34rQ
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 22, 2021