मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांची आज पहिली पुण्यतिथी (Rishi Kapoor Death Anniversary) आहे. देशभरातील चाहते आज त्यांची आठवण काढत आहेत. ऋषी कपूर सुरुवातीपासूनच वेगळ्या स्वभावाचे होते. ते खूप हट्टी आणि नेहमीच आपल्या कामात व्यस्त असायचे. त्यांनी नेहमीच स्वत:कडे लक्ष दिले आणि बॉलिवूडमध्ये भरीव कामगिरी केली. पण अभिनेत्याच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला होता. ऋषी यांना कॅन्सर होता, त्यांनी आपल्या आयुष्याशी संबंधित ही गोष्ट आपल्या चाहत्यांपासून नेहमी लपवून ठेवली. या प्रकरणाची बातमी केवळ घरातील सदस्यांनाच होती आणि काही निकटवर्तीयांनाही याबद्दल माहिती होती (Rishi Kapoor Death Anniversary Special actor hides his illness from fans).
ऋषी कपूर आपली मुलगी रीद्धिमाच्या खूप जवळ होते, पण मुलगा रणबीर कपूरसोबतचे त्यांचे संबंध फारसे चांगले नव्हते. ऋषी आणि रणबीर सुरुवातीपासून वेगळे राहत होते. असे म्हणतात की ऋषी यांची पत्नी नीतू कपूर यांनी हे घर एकत्र बांधून ठेवले होते. पण चित्रपटाच्या यशानंतर रणबीर कपूरने स्वत: साठी एक स्वतंत्र घर विकत घेतले आणि आई-वडिलांपासून वेगळे रहायला सुरुवात केली.
रणबीरचे नाव बॉलिवूडच्या अनेक बड्या अभिनेत्रींशी जोडले गेले होते. प्रत्येकजण ऋषी कपूरला रणबीर कपूरबद्दल विचारत असत, परंतु अभिनेत्याने आपल्या मुलाच्या कामात कधीच कोणतीही रुची दाखवली नाही. जेव्हा जेव्हा त्यांना मुलाबद्दल प्रश्न विचारले गेले, तेव्हा ते नेहमीच असे म्हणत टाळत राहिले की, ‘हे त्याचे स्वतःचे आयुष्य आहे, तुम्ही त्यालाच विचारा की तो लग्न कधी करणार? कोणाशी लग्न करणार?’
Hello all! I am taking a short leave of absence from work to go to America for some medical treatment. I urge my well wishers not to worry or unnecessarily speculate. It’s been 45 years “plus”of wear and tear at the movies. With your love and good wishes,I will be back soon!
— Rishi Kapoor (@chintskap) September 29, 2018
2019 मध्ये ऋषी कपूर यांनी त्यांच्या ट्विटरवर एक ट्विट लिहिले होते की, प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना उपचारासाठी अमेरिकेला जावे लागते आहे. जवळपास 11 महिने ते हॉस्पिटलमध्ये दाखल होते, तेथून त्यांचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होती. बॉलिवूडचे अनेक मोठे कलाकार त्यांना भेटायला अमेरिकेत जात होते. यावेळी उपचारांच्या खर्चाबाबत अफवा देखील पसरल्या होत्या (Rishi Kapoor Death Anniversary Special actor hides his illness from fans).
अमेरिकेत उपचार सुरू असताना ऋषी कपूर यांच्याकडेही पैशांची कमतरता होती. असे म्हटले जाते की, त्या काळात मुकेश अंबानी यांनी त्यांची मदत केली. मुकेश अंबानी आणि नीता अंबानीही ऋषी कपूरला भेटण्यासाठी न्यूयॉर्कला पोहोचले होते. जेथे त्यांनी ऋषी कपूर यांच्या उपचाराच्या खर्चासाठी पैसेही दिले. कोणालाही या प्रकरणाचे सत्य माहित नाही, परंतु त्या काळात प्रसिद्ध झालेल्या काही माध्यमांच्या अहवालातही याचा उल्लेख केला गेला होता. ऋषी कपूर आणि नीतू कपूर दोघांनीही सोशल मीडियावर त्यांच्यासाठी एक पोस्ट शेअर केले होती.
ऋषी कपूर यांना ल्युकेमिया होता. हा पांढऱ्या रक्त पेशींचा कर्करोगाचा एक प्रकार आहे. यावर उपचार घेण्यासाठी ऋषी कपूर अनेक वेळा अमेरिकेत गेले. 2018मध्ये ऋषी कपूर यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. त्यांच्यावर 11 महिने उपचारही झाले. सप्टेंबरमध्ये ऋषी कपूर अमेरिकेतून परत आले. कुटुंबासमवेत बराच वेळ घालवला.
28 एप्रिल 2020 रोजी संध्याकाळी ऋषी कपूरची तब्येत अचानक बिघडली आणि त्यानंतर त्यांना सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जेथे तातडीने त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. त्याचवेळी त्यांचे रूग्णालयातील काही व्हिडीओही समोर आले होते. परंतु 30 एप्रिल रोजी सकाळी 8 : 45 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
(Rishi Kapoor Death Anniversary Special actor hides his illness from fans)
ऋषी-राजीवच्या निधनानंतर एकटे पडले रणधीर कपूर, वडिलोपार्जित घर विकण्याचा घेतला निर्णय!
‘नाव सुचत नव्हतं, इतक्यात त्यांनी दरवाजा ठोठावला..’, वाचा ‘धनंजय माने इथेच राहतात का?’चा किस्सा…