मुंबई : अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) बॉलिवूडमध्ये स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलं आहे. विलासराव देशमुखांच्या लेकाचं मराठीजनांना कौतुक आहेच, मात्र हिंदी सिनेविश्वातील स्टार मंडळींचाही तो यार आहे. राजकीय कुटुंबाची पार्श्वभूमी, बॉलिवूड पदार्पण करतानाच ‘मुख्यमंत्र्यांचा मुलगा’ हा लागलेला टॅग अशी अनेक ओझी असतानाही त्याने यशस्वी कारकीर्द केली. अभिनेत्री जेनेलिया डिसुझासोबत (Genelia Dsouza) रितेशची जोडी शोभून दिसते. रितेश देशमुखच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज (17 डिसेंबर) चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने रितेश-जेनेलियाची लव्हस्टोरी जाणून घेऊया. (Riteish Deshmukh Genelia Dsouza love Story)
रितेशने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये आपल्या लग्नाशी संबंधित एक किस्सा सांगितला होता. ही गोष्ट तेव्हाची आहे, जेव्हा अभिनेत्री जेनेलिया डिसुझाला तो डेट करत होता. त्यांच्या डेटिंगला एक वर्षापेक्षा जास्त काळ लोटला होता. मात्र त्यावेळी दोघांना खोटं लग्न करावं लागलं.
बॉलिवूडमध्ये एकत्र पदार्पण
रितेश आणि जेनेलिया यांनी 2003 मध्ये तुझे मेरी कसम चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. दोघांचा हा पहिलाच सिनेमा होता. मोठ्या पडद्यावर एकत्र झळकलेली जोडी चाहत्यांना भावली. लेखक मिलाप झवेरी आणि दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी रितेश-जेनेलियाच्या जोडीला मस्ती चित्रपटातून पुन्हा मोठ्या पडद्यावर आणायचं ठरवलं.
डेटिंग करताना लग्नाचा सीन
दोघांनी 2002 मध्ये डेटिंग सुरु केलं आणि 2003 मध्येच सिनेमाच्या निमित्ताने का होईना, दोघांना लग्नाचा सीन करावा लागला. भविष्यात काय होईल, माहिती नाही, पण या क्षणाचा आनंद आपण घ्यायला हवा, असं जेनेलिया म्हणते. आम्ही तो सीन हसण्यावारी नेला, आणि पुढे गेलो, अशी आठवण रितेशने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सांगितली होती.
रितेशच्या प्रँकमुळे ब्रेकअपची वेळ
रितेशने एके दिवशी जेनेलियासोबत प्रँक म्हणजेच खोडसाळपणा करण्याचं ठरवलं. त्यावेळी दोघांचं डेटिंग सुरु होतं. रितेशने खट्याळपणे जेनेलियाला मेसेज केला, की चल आपण वेगळे होऊ. मात्र जेनेलियानेही गोष्ट गांभीर्याने घेतली. खरंच प्रकरण ब्रेकअपवर आलं. शेवटी कसंबसं रितेशने हा आपला प्रँक असल्याचं जेनेलियाला समजावलं. त्यानंतर दोघांमध्ये कधीही वेगळं होण्याचा विषय निघाला नाही. आजच्या घडीला रितेश-जेनेलिया ही नावं आपसूकच एकत्र ओठी येतात. बॉलिवूडमधील रिअल लाईफ सेलिब्रिटी कपल्समध्ये त्यांचं नाव अग्रक्रमावर घेतलं जातं.
संबंधित बातम्या :
Riteish Genelia Organ Donation | रितेश-जेनेलिया यांचा अवयवदानाचा निर्णय
(Riteish Deshmukh Genelia Dsouza love Story)