रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे दोघे फक्त बॉलिवूडमधीलच नव्हे तर सोशल मीडियावरचंही पॉवर कपल आहे. मोठ्या पडद्यावर धमाल करणारे रितेश-जेनेलिया सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. बऱ्याचवेळा ते त्यांचे मजेशीर रीलस बनवून शेअर करत असतात आणि ते पाहून चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलतं. याच जोडीने नुकतंच एक नव, मजेशीर नव रील बनवलं आहे. जे सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झालं असून त्यावर फक्त चाहत्यांच्याच नव्हे तर सेलिब्रिटींच्याही कमेंट्स आल्या आहेत.
रितेश आणि जेनेलिया देशमुख यांनी एक लेटेस्ट रील बनवून चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. ‘जाने तू या जाने ना’ फेन या अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचं लेटेस्ट रील पोस्ट केला आहे. हे रील रितेशपासून सुरू होतं. यामध्ये तो 1997 सालच्या रोमँटिक मूव्ही, मिस्टर अँड मिसेस खिलाडी मधील जुही चावलाच्या अकेला है मिस्टर खिलाडी या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
मात्र तेवढ्यात त्याच्या मागून जेनेलियाची एंट्री होती. स्मार्ट पत्नी असलेली जेनेलिया येते आणि रितेशचं गाणं बदलून नवं गाणं लावते. बिवी नंबर 1 गाणं सुरू करते आणि तिच्या पतीला, अर्थात रितेशला त्या गाण्यावर रील बनवण्यास सांगते. त्यावर रितेशचा चेहरा बघण्यालायक होतो. ‘बिवी नंबर 1 विथ नॉर्मल नवरा रितेश’ अशी कॅप्शन लिहीत जेनेलियाने हे रील शेअर केलंय.
पोस्टवर चाहत्यांच्या, सेलिब्रिटींच्या कमेंट्सचा पाऊस
त्यांचं हे नव रील चाहत्यांना खूप आवडलंय आणि सेलिब्रिटीही त्यावर खूप खुश झाले आहेत. या पोस्टवर ‘ मिस्टर अँड मिसेस खिलाडी ‘ चित्रपटातील अभिनेत्री, जुही चावलानेही रिॲक्शन दिली आहे. तिने कमेंट सेक्शनमध्ये एक हसणारी ईमोजी टाकली आहे. त्यावर जेनेलियाने Awww.. असं लिहीत रिप्लाय दिला. जुही चावला हिच्या व्यतिरिक्त नील नितीन मुकेश, मुश्ताक शेख, हंसिका मोटवानी आणि जय भानुशाली यांसारख्या कलाकारांनी या पोस्टवर कमेंट करत रिॲक्शन दिली.