Sushant Singh Rajput case : अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput Last Instagram Post) वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी आत्महत्या केली. सुशांतने वांद्र्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवलं. त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्यापही (Sushant Singh Rajput Instagram Post) अस्पष्ट आहे. पण आता कूपर रुग्णालयात कर्मचारी रुपकुमार शाह यांनी सुशांतची आत्महत्या नाही, तर हत्याच झाल्याचं स्पष्ट केलं आहे. रुपकुमार शाह यांनी आतापर्यंत जवळपास 40 ते 50 हजार मृतदेह जास्त मृतदेहांचं शवविच्छेदन केलं आहे.
जेव्हा अभिनेत्याचं शवविच्छेद करण्यात आलं तेव्हा रुपकुमार शाह त्याठिकाणी उपस्थित होते. अभिनेत्याचं मृतदेह पाहून त्यांनी हत्याच झाली असल्याची करणे सांगितलं आहे. ‘हत्या आणि आत्महत्या यामध्ये प्रचंड फरक असतो…’ असं शाह म्हणाले.
‘मृतदेह पाहिल्यानंतर लगेच कळतं की हत्या आहे की आत्महत्या. हत्या आणि आत्महत्या यामध्ये प्रचंड फरक असतो. सुशांतच्या गळ्यावर वर्ण होते, ते हत्येप्रमाणे दिसत होते. शरीरावर मुक्का मार होता. आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या शरीरावर एवढ्या मोठ्या प्रमाणात मुक्का मार नसतो.’ असं देखील शाह म्हणाले.
सुशांतच्या आत्महत्येची कारणं सांगितल्यानंतर शाह यांना तुम्ही प्रथमदर्शी शवविच्छेदनाची प्रक्रिया पाहिली, याबद्दल किती आत्मविश्वाने सांगता? असा प्रश्न देखील विचारण्यात आला.
रुपकुमार शाह पूर्ण आत्मविश्वासाने सांगत म्हणाले, ‘सुशांत मोठा अभिनेता होता. अनेक सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे आणि असा व्यक्ती जर आत्महत्या करत आहे, तर आम्ही त्याचा मृतदेह व्यवस्थित हाताळून पाहणारच. हाता-पायाला मार लागलेला माणूस गळफास कसा लावू शकेल?’ असा प्रश्न शाह यांनी उपस्थित केला.
सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput ) 14 जून 2020 मध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. पण अभिनेत्याच्या निधनानंतर ही आत्महत्या नसून हत्याचं असल्याचं अनेकदा सांगण्यात आलं. सुशांत आत्महत्याप्रकरणी आजही अनेक अशा गोष्टी समोर येत आहेत, ज्या थक्क करणाऱ्या आहेत.