सैफ राहत असलेल्या इमारतीतील फ्लॅटचे रेंट किती? रक्कम ऐकून चक्रावून जाल

| Updated on: Jan 16, 2025 | 1:14 PM

सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यामुळे सैफ राहत असलेल्या त्याच्या बांद्रा येथील इमारतीच्या आणि फ्लॅटच्या चर्चा होताना दिसत आहे. सैफ अली खान राहत असलेल्या इमारतीतील फ्लॅटची किंमत किती आणि रेंट किती आहे अशाही चर्चा होताना दिसत. दरम्यान फ्लॅटची किंमत आणि रेंटची रक्कम ऐकून कोणालाही धक्का बसेल.

सैफ राहत असलेल्या इमारतीतील फ्लॅटचे रेंट किती? रक्कम ऐकून चक्रावून जाल
Follow us on

काल रात्री अभिनेता सैफ अली खानवर मोठा हल्ला झाला, या हल्ल्यात हल्लेखोराने त्याच्या मानेवर 6 वेळा वार केले, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचं समजत आहे.

दरम्यान या घटनेमुळे सैफ बांद्रा येथे राहत असलेल्या इमारतीच्या आणि फ्लॅटच्या चर्चा होताना दिसत आहे. सैफ अली खान राहत असलेल्या इमारतीतील फ्लॅटची किंमत किती आहे? हे ऐकून कोणालाही धक्का बसेल.

फ्लॅटची किंमत किती?

सैफ राहत असलेल्या मुंबईतील फ्लॅटची किंमत काय आहे आणि मुंबईत तो किती सुरक्षित आहे. आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत. सैफ अली खान हा बांद्रा पश्चिम येथील सतगुरू शरण अपार्टमेंटमध्ये राहतो. अपार्टमेंटमधील वरील चार माळे हे सैफचे घर आहे. तसेच त्याच्या घराचं इंटीरिअर डिझाइन दर्शिनी शाहने केल आहे.

त्याच्या घरातील वस्तू, फर्निचर हे एक क्लासिक कलेक्शन असल्याचं म्हटलं जात. दरम्यान या इमारतीतील फ्लॅटची किंमत ही फ्लॅटच्या आकारांवर तसेच 1 बीएच के, 2 बीएच के किंवा 3 बीएच के यावर आधारित आहे. पण शक्यतो येथील फ्लॅटचे रेंट हे लाखो आणि करोडोंच्या किंमतीत असल्याचं म्हटलं जातं आहे.

बांद्रा मध्ये फ्लॅटची किंमत करोडोंच्या घरात अन् रेंट लाखोंच्या घरात

तुम्हाला सांगतो की, मुंबईतील बांद्रा येथे ज्या ठिकाणी हा हल्ला झाला ते मुंबईचा सर्वात पॉश एरिआ आहे. सैफ अली खानसह अनेक बड्या बॉलिवूड सेलिब्रिटींची तेथे घरे आहेत. सलमान खानही मुंबईतील बांद्रा येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. याशिवाय अनेक कलाकारही बांद्रामध्ये राहतात.

मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खानच्या घराची किंमत 55 करोड असल्याचं म्हटलं जातं. तर बांद्रामधील बहुतेक 1 BHK फ्लॅटचे भाडे 3 लाख ते 5 लाख रुपये प्रति महिना आहे. तर काही फ्लॅटचे भाडे आठ लाख रुपयांहून अधिक आहे.

बांद्रामध्येच सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची किंमत 100 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या तिन्ही खानशिवाय करण जोहर, जॉन अब्राहम, रणवीर सिंग (जुने घर), रणबीर कपूर-आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, करीना कपूर-सैफ अली खान, मलायका अरोरा खान, अनन्या पांडे यांसारखे अनेक स्टार्स राहतात.

सैफची प्रकृती स्थिर
मिळालेल्या माहितीनुसार सैफची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरून पोलिसांना सुगावा मिळण्याची आशा आहे.