अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास चाकूने हल्ला करण्यात आल्याच्या धक्कादायक घटनेंन सर्वांनाच विचारात पाडलं आहे.
अभिनेत्याला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याच्या तब्येतीबद्दल चाहते चिंतेत आहेत. पोलिसांकडून चाहत्यांना शांतता ठेवण्याचे वारंवार आवाहन करण्यात येत आहे.
हॉस्पिटलमधून सैफच्या तब्येतीबाबत अपडेट
गुरुवारी सकाळी बॉलीवूडप्रेमींना जाग येताच सैफ अली खानवर त्याच्या घरी हल्ला झाल्याचे ऐकून त्यांना धक्काच बसला. त्याच्यावर सर्जरी झाली असून तो आता पूर्णपणे धोक्याबाहेर असल्याचं म्हटलं जातं आहे. सैफच्या हातासोबतच त्याच्या शरीरावरही काही ठिकाणी गंभीर जखमा झाल्याचं सांगण्यात येत आहे.
या हल्ल्यात त्याच्या मानेला, डाव्या मनगटाला, छातीला दुखापत झाली आणि चाकूचा एक छोटासा भाग त्याच्या पाठीतून काढण्यात आला होता. पाठीच्या कण्याला दुखापत झाल्यामुळे तातडीनं ऑपरेशन करावं लागलं. ऑपरेशन यशस्वी झालं असून त्याती प्रकृती आता स्थिर असल्याचं म्हटलं जात आहे.
डिस्चार्जबाबतही महत्त्वाची माहिती समोर
सैफ अली खानवर झालेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच सैफ जेव्हा या हल्ल्याबाबात स्टेटमेंट देऊ शकेल तेव्हा पोलिसांकडून याबाबत आणखी अपडेट समोर येण्याची नक्कीच शक्यता आहे.
तसेच रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या सैफच्या डिस्चार्जबाबतही एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सैफला संध्याकाळपर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय.
हल्ला कसा झाला?
काल रात्री उशिरा एक अज्ञात व्यक्ती अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसला आणि त्याच्या मोलकरणीसोबत वाद घालू लागला. जेव्हा अभिनेत्याने त्यात हस्तक्षेप करून त्या व्यक्तीला शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या व्यक्तीने सैफ अली खानवरही हल्ला करून त्याला जखमी केले. या हल्ल्यात त्याच्यावर 6 वार झाले. त्याच्या मनक्यावर खोलवर जखम झाली.
थ्री लेयर सिक्युरिटी तरीही ती व्यक्ती घरात कशी घुसते?
या हल्ल्यामुळे वारंवार सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. सैफ अली खान आणि करीना कपूर आपल्या दोन मुलांसोबत ज्या इमारतीत राहतात तिथे थ्री लेयर सिक्युरिटी आहे. एवढी सिक्युरिटी असतानाही ती अज्ञात व्यक्ती घरात घुसण्याची हिंमत करतेच कशी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
घरातील तीन नोकरांना ताब्यात घेण्यात आलं
हल्लेखोर घरात कसा घुसला याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे तिघेही सैफच्या घरात काम करतात. हल्लेखोराने यापूर्वी या घरात काम केले असावे म्हणजे तो व्यक्ती आधीपासूनच कोणाच्यातरी ओळखीचा असावा असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.