मुंबई : विराट कोहली आणि अनुष्का शर्माला महिन्यात कन्या रत्न प्राप्त झालं आहे. बाळाची घोषणा करताना या दोघांनीही सर्व माध्यम फोटोग्राफर्सला बाळाची गोपनीयता राखण्याचं आवाहन केलं. विराट आणि अनुष्कानंतर आता करीना कपूर आणि सैफ अली खान देखील त्यांच्या दुसर्या बाळासाठी समान नियमांचं पालन करणार असल्याची माहिती आहे. सैफ आणि करीना देखील आपल्या दुसर्या बाळाबद्दल थोडे सावध झाले आहेत. ते आता अधिक काळजीपूर्वक जगतील आणि दुसर्या मुलाच्या गोपनीयतेची पूर्ण काळजी घेतील. तैमूर अली खानच्या बाबतीत झालेल्या चुकांची त्यांना पुन्हा पुनरावृत्ती करण्याची इच्छा नाही.
प्रत्येक वेळी तैमूरच्या मागे फोटोग्राफर्स पोहचायचे. इतकंच नाही तर आता फोटोग्राफरला पाहिल्यानंतर तैमूर स्वत: नो फोटो असं बोलतो. इतकंच नाही तर काही वेळा तो फोटोग्राफर्सवर ओरडतोसुद्धा.
विराट आणि अनुष्काच्या मित्रांनी स्पॉटबॉयशी बोलताना सांगितलं की, ‘आम्हाला आत्ता त्यांना भेटण्यासाठी येऊ नका असं सांगण्यात आलं आहे आणि आम्ही त्यांच्या निर्णयाचा आदर करतो. मुलांचे फोटो क्लिक केल्याची तक्रार करणारे कलाकारसुद्धा स्वत:साठी काही करत नाहीत. तुम्हाला तुमची गोपनीयता ठेवण्यासाठी फोटोग्राफरना सांगावं लागेल. ते तुमचं एकतील. शिल्पाच्या मुलीचे फोटो तिने स्वत: शेअर करेपर्यंत अजूनही कुणी शेअर केले नाही ‘
त्यांनी हेही सांगितलं की विराट हा बॉलिवूडपेक्षा मोठा स्टार आहे. जर त्यानं हा ट्रेंड सेट केला तर बॉलिवूड स्टार्ससुद्धा याला फॉलो करतील.
फोटोग्राफरना भेटवस्तू देऊन केलं आवाहन
खरं तर यापूर्वी अनुष्का आणि विराटनं फोटोग्राफरना भेटवस्तू देऊन संदेश पाठवला सोबतच गोपनीयतेचा आदर करत मुलीपासून दूर राहावं अशी विनंती विराट आणि अनुष्कानं केली . याचा एक व्हिडिओसुद्धा व्हायरल होत आहे. या संदेशात असं लिहिलंय की, ‘आम्हाला आमच्या मुलीच्या प्रायव्हसीचं रक्षण करायचं आहे आणि यासाठी आम्हाला तुमच्या समर्थनाची गरज आहे.
आम्ही नेहमीच लक्षात ठेवतो की तुम्हाला तुमचा कंटेंट मिळावा, मात्र आमची एवढीच इच्छा आहे की तुम्ही असा कुठलाही कंटेंट शेअर करू नये जो आमच्या मुलीशी निगडीत असेल. ‘टीव्ही 9 ला मिळालेल्या माहितीनुसार या सगळ्या फोटोग्राफर्सनी अनुष्का-विराटची ही विनंती मान्य केली आहे.
काही दिवसांपूर्वी अनुष्कानं व्होग मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, दोघंही आपल्या बाळाला माध्यमांपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतील. त्यांचं मूल खोडकर होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे. अनुष्कानं सांगितलं होतं की तिनं आणि विराटनं बाळाला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही याबद्दल खूप विचार केला. आम्हाला आमच्या बाळाला सोशल मीडियाच्या या जगात अडकवायचं नाहीये. ते बाळ मोठं झाल्यानंतर तो त्याचा निर्णय घेईल. हे जरा कठीण आहे मात्र आम्हाला हे करायचंय.