Saira Banu Instagram Debut : हिंदी सिनेसृष्टीतील असे अनेक कलाकार, अशा अनेक जोड्या आहेत ज्या पुढील काळातही चाहत्यांच्या सदैव स्मरणात राहतील. दिवंगत अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) हे असे एक नाव आहे, जे पुढील कित्येक पिढ्या विसरू शकणार नाहीत. त्यांचा आवाज, खणखणीत अभिनय यामुळे त्यांचे लाखो चाहते होते. ते हिदी चित्रपटसृष्टीचा एक महत्वाचा भाग आहेत. आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांचा नेहमीच उल्लेख होत राहतो. आज ७ जुलै रोजी दिलीप कुमार यांचे निधन होऊन दोन वर्षे पूर्ण झाली.
त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांची पत्नी आणि दिग्गज अभिनेत्री सायरा बानू (Saira Banu) यांनी इन्स्टाग्राम (instagram debut) या सोशल मीडिया अकाऊंवर पदार्पण केले आहे. दिलीप कुमार यांच्या आठवणींना उजाळा देत सायरा बानू यांनी त्या दोघांचे काही फोटोही शेअर केले आहेत. एका त्यांचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे. तर दुसऱ्या रंगीत फोटोत सायरा बानो आणि दिलीप कुमार आनंदाने हसताना दिसत आहेत. हे फोटो शेअर करताना सायरा बानू यांनी एक सुंदर कॅप्शनही लिहिली आहे.
सायरा बानो लिहीतात, ‘सुकून-ए-दिल के लिए कुछ तो एहतेमाम करूं, जरा नजर जो मिले फिर उन्हें सलाम करूं, मुझे तो होश नहीं आप मशवरा दीजिए, कहां से छेड़ूं फसाना कहां तमाम करूं. ‘ अशा शब्दांत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याशिवाय त्यांनी एक मोठी, भावपूर्ण पोस्टही लिहीली आहे.
7 जुलै 2021 रोजी 7 वाजता दिलीप कुमार यांचे निधन झाले. मात्र ते आजही माझ्या सोबत आहेत, अशा भावना सायरा बानू यांनी व्यक्त केल्या आहेत.
इंस्टाग्रामवर पदार्पण करतानाच, आपण दिलीप कुमार यांच्या जीवनाशी संबंधित काही किस्से इथे सांगत राहू, असेही सायरा बानू यांनी नमूद केले. त्या दिलीप साहेबांचे जीवन सर्वांसोबत शेअर करणार आहे. इन्स्टाग्राम पदार्पणाबद्दल अनेकांनी सायरा बानू यांचे अभिनंदन तसेच स्वागतही केले आहे.