मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खानच्या अडचणीत वाढ झाली आहे. अलीकडेच जिया खानच्या बहिणीनं साजिद खाननं अभिनेत्रीवर लैंगिक छळा केला असा गंभीर आरोप केला होता. जियाची बहीण करिश्मानं साजिदवर जियाशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. तर आता अभिनेत्री शर्लिन चोप्रानंही साजिद खानवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. शर्लिननं तिच्यावर झालेल्या चुकीच्या आरोपाबद्दल ट्विट केले आहे.
When I had met him in April 2005, a few days after my father’s demise, he had taken his penis out of his pants and had asked me to feel it.
I remember having told him that I know how a penis feels like & that the purpose of my meeting with him was not to feel or rate his penis.. https://t.co/2gnGSdEIrU— Sherni (@SherlynChopra) January 18, 2021
शर्लिननं ट्वीट करत ही माहिती दिली आहे – जेव्हा माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी एप्रिल 2005 मध्ये मी साजिद खानला भेटले तेव्हा त्यानं त्याच्या पॅन्टमधून त्याचा खाजगी भाग काढून मला तो पकडायला सांगितला. मला आठवतंय की मी त्याला सांगितलं होतं की, खाजगी भाग कसा असतो हे मला माहित आहे आणि मी त्याला भेटायचा उद्देश आहे त्याचा खासगी भाग पकडण्याचा नाही.
अभिनेत्री जिया खानच्या जीवनावरील ‘डेथ इन बॉलिवूड’ ही डॉक्यूमेंट्री नुकतीच यूकेमध्ये प्रसिद्ध झाली आहे. बीबीसी 2 वर या माहितीपटाच्या दुसर्या पर्वामध्ये जियाची बहीण करिश्मा यांनी दिग्दर्शक साजिद खानवर अभिनेत्रीशी लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप केला आहे. करिश्माच्या म्हणण्यानुसार, तिच्याशी झालेल्या या गैरवर्तनानंतर जिया रडत घरी आली. अभिनेत्रीच्या बहिणीनं असंही सांगितलं की साजिदनं तिचा फायदा घेण्यासाठी खूप प्रयत्न केले.
या डॉक्यूमेंट्रीमध्ये करिश्मानं सांगितलं, “तालीम सुरू होती. जिया स्क्रिप्ट वाचत होती आणि साजिद खाननं तिला टॉप आणि ब्रा काढायला सांगितलं. काय करावं हे तिला कळत नव्हतं, चित्रपट अजून सुरू झालेला नाही आणि हे सर्व घडत आहे. ती घरी आली आणि खूप रडली. करिश्मानं पुढे सांगितलं, की जियानं आम्हाला सांगितले की- ‘माझा एक करार आहे आणि जर मी हा चित्रपट सोडला तर ते माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करतील आणि मला बदनाम करतील. मात्र मी हा चित्रपट केल्यास मला लैंगिक छळ होईल. काहीतरी हरवल्याची परिस्थिती आहे. ”म्हणून जियानं तो चित्रपट केला.
2018 मध्ये सुरू झालेल्या #MeToo मोहिमेदरम्यान साजिद खानवर अनेक महिलांनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. ज्यामध्ये सलोनी चोप्रा, अहाना कुमरा, मंदाना करीमी, मॉडेल पॉला आणि एक पत्रकार यांचा समावेश होता. ज्यानंतर साजिद खानला बर्याच चित्रपटांमध्ये काम करण्यास बंद करण्यात आले.