‘बिग बॉस 14’ स्पर्धकांच्या उद्धटपणामुळे सलमानला राग अनावर, म्हटले शो सोडणार !

| Updated on: Feb 08, 2021 | 12:53 PM

'बिग बॉस 14' स्पर्धकांच्या उद्धटपणामुळे सलमानला राग अनावर, म्हटले शो सोडणार !(Salman gets angry due to the arrogance of the contestant)

बिग बॉस 14 स्पर्धकांच्या उद्धटपणामुळे सलमानला राग अनावर, म्हटले शो सोडणार !
'बिग बॉस 14' स्पर्धकाच्या उद्धटपणामुळे सलमानला राग अनावर
Follow us on

मुंबई : देशातील सर्वात वादग्रस्त शो बिग बॉसमुळे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. सुरुवातीला बिग बॉसचे 14 वे सिझन फारच कंटाळवाणे होते. त्यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी शो चे मिर्माते जुन्या स्पर्धकांना चॅलेंजर बनवून बिग बॉसच्या घरात आणत होते. जेव्हापासून या चॅलेंजर्सने बिग बॉसच्या घरात प्रवेश केलाय तेव्हापासून बिग बॉसच्या घरात हंगामा पहायला मिळतोय. या आठवड्यातील कार्यक्रमाचा एपिसोड अधिकच वादग्रस्त ठरला. घरातल्या स्पर्धकांमुळे शो चा होस्ट सलमान खान एवढा हैराण झाला की, या रविवारच्या वॉर एपिसोडमध्ये त्याने शो सोडत असल्याचे म्हटले.(Salman gets angry due to the arrogance of the contestant)

शो जेव्हा सुरु झाला तेव्हा सलमान खूपच उदास दिसत होता. आपण पुन्हा हा शो करु इच्छित नसल्याचे सलमानने यावेळी जाहीर केले. स्पर्धकांच्या वर्तवणुकीमुळे आपण नाराज असल्याचे सलमानने सांगितले. सलमान पुढे म्हणाला की, आपण बिग बॉस शो च्या 11 सिझनचे होस्ट होतो. प्रेक्षक आपल्याला विचारतात स्पर्धकांशी कसे डील करता. मात्र आपण स्पर्धकांचं कौतुकच करीत असल्याचे सलमान म्हणाला. (Salman gets angry due to the arrogance of the contestant)

सलमानचा खुलासा

स्पर्धकांचा क्लास लावतो तेव्हा स्पर्धक नेहमी कौतुक करतात. मला कॉम्पिमेंट देतात, की आज तुम्ही सर्वांना चांगले धारेवर धरले. हे प्रेक्षकांसाठी मनोरंजन असू शकते, मात्र अशी कॉम्पिमेंट मला बिलकुल आवडत नाही. मी हे बिलकुल एन्जॉय करीत नाही, हे केवळ माझं काम आहे. पुढे सलमान म्हणाला की, तो शो चालवण्यासाठी स्पर्धकांशी खेळीमेळीने वागतो. यापैकी असे अनेक जण आहेत ज्यांनी शो संपल्यानंतरही आपल्यासोबत काम केले आहे. मात्र यावेळी स्पर्धकांनी आपली मर्यादा ओलांडली आहे आणि याबाबत प्रेक्षकांमधूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. शनिवारी झालेल्या एपिसोडनंतर मी शो सोडण्याचा विचार केला होता. मात्र तरीही आपण आलो कारण हे आपलं काम आहे.(Salman gets angry due to the arrogance of the contestant)

इतर बातम्या

आजारातून उठताच रेमो डिसूझाचा काळ्या रंगावरून धक्कादायक खुलासा, म्हणाला….!

नव्या-मीजानच्या रिलेशनशिपवर जावेद जाफरी यांनी केलं मोठं भाष्य!