Salman Khan: सलमान खानच्या हत्येचा कटा संदर्भातील तपासासाठी मुंबई पोलिसांनी उचलले मोठे पाऊल

| Updated on: Sep 16, 2022 | 12:42 PM

लॉरेन्स बिश्नोईच्या सांगण्यावरून हे लोक सलमान खानच्या मुंबईतील पनवेल फार्महाऊसजवळ दीड महिना राहिले पण त्यांना सलमान खानला मारण्याची संधी मिळाली नाही. सलमान खानशी संबंधित संपूर्ण खुलासा आणि सलमान खानच्या हत्येच्या कटाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक पंजाबमध्ये पोहोचले आहे.

Salman Khan: सलमान खानच्या हत्येचा कटा संदर्भातील तपासासाठी मुंबई पोलिसांनी उचलले मोठे पाऊल
salman khan
Image Credit source: Instagram
Follow us on

बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman khan) हत्येच्या कटात पंजाब पोलिसांकडून(Panjab Police) नुकताच धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. याची दाखल घेत मुंबई पोलिसांचे (Mumbai  Police) पथक तपासासाठी पंजाबमध्ये पोहोचले आहे. सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शूटर्सच्या माध्यमातून सलमान खान प्रकरणाबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांचे तपासासाठी पथक पंजाबमध्ये पोहोचले आहे. पोलिसांनी या प्रकरणात अलीकडेच अटक करण्यात आलेले शार्प शूटर दीपक मुंडी आणि कपिल पंडित यांची सलमान खानच्या रेकीबाबत केलेल्या खुलाशांच्या संदर्भात पोलीस चौकशी करणार आहेत.

आरोपी पंजाब पोलिसांच्या ताब्यात

हे दोन्ही गुंड सध्या पटियाला येथील राजपुरा येथील सीआयए कर्मचाऱ्यांच्या कार्यालयात पंजाब पोलिसांच्या रिमांडवर आहेत. नुकतेच या दोन्ही गुंडांनी रिमांड दरम्यान पंजाब पोलिसांना सांगितले आहे की, लॉरेन्स बिश्नोईच्या सांगण्यावरून हे लोक सलमान खानच्या मुंबईतील पनवेल फार्महाऊसजवळ दीड महिना राहिले पण त्यांना सलमान खानला मारण्याची संधी मिळाली नाही. सलमान खानशी संबंधित संपूर्ण खुलासा आणि सलमान खानच्या हत्येच्या कटाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक पंजाबमध्ये पोहोचले आहे.

या कारणांसाठी करायची होती हत्या

लॉरेन्स बिश्नोईला सलमान खानची हत्या करून 1998 च्या काळवीट शिकारीचा बदला घ्यायचा आहे. रिपोर्ट्सनुसार, पोलिस रिमांडमध्ये बिश्नोईनेच खुलासा केला होता की, त्याने 2018 साली सलमान खानच्या हत्येची सर्व तयारी केली होती. यासाठी त्याने एक खास रायफलही खरेदी केली होती, ज्यासाठी त्याने 4 लाख रुपये दिले होते.

हे सुद्धा वाचा