Salman Khan | सलमान खानचं खरं नाव काय ?, फारच कमी लोकांना..

| Updated on: Dec 27, 2023 | 1:34 PM

Salman Khan: दर वर्षीप्रमाणे याही वर्षी सलमानने त्याच्या वाढदिवसानिमित्त जोरदार पार्टी केली . आज केवळ सलमानचाच नाही तर त्याची भाची आयत खानचाही वाढदिवस आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण सलमान खानच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.

Salman Khan | सलमान खानचं खरं नाव काय ?, फारच कमी लोकांना..
Image Credit source: social media
Follow us on

Salman Khan Birthday | बॉलिवूडचा सुपरस्टार, दबंग खान , अभिनेता सलमान खान हा भाईजान नावानेही ओळखला जातो. सलमानचे लाखो-करोडो फॅन आहेत. पण सलमान खानचं खरं नाव काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का ? घरचे सोडले तर संपूर्ण जग त्याला सलमान खान नावानेच ओळखतं, पण त्याच खरं नाव काही वेगळचं आहे. फार कमी जणांना ते माहीत असेल. सलमान आज त्याचा 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. पण त्याला पाहून कुणालाही खरं वाटणार नाही की तो तब्बल 58 वर्षांचा आहे.

देसी फूड खाऊन, भरपूर व्यायाम करून सलमान आजही फक्त ४० वर्षांचा वाटतो. एवढंच नव्हे तर आजही तो मोठ्या पडद्यावर खूप सक्रिय आहे. चित्रपटांसोबतच तो रिॲलिटी शोही होस्ट करतो. विशेष म्हणजे आज फक्त सलमान खानचाच नव्हे तर त्याची भाची, आयत हिचाही वाढदिवस असतो. आयत ही सलमानची बहीण अर्पिता खान आणि अभिनेता आयुश शर्मा यांची मुलगी आहे.

आज त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण सलमान खानच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.

हे सुद्धा वाचा

सलमानचं खरं नाव काय ?

असे अनेक लोक आहेत ज्यांना अजूनही सलमानचे खरे नाव माहित नाही. सलमान खानचे खरे नाव अब्दुल रशीद सलीम सलमान खान आहे. पण चित्रपटसृष्टीत आल्यावर मात्र सलमानने त्याचं नाव बदललं. सलमानचे आजोबा आणि त्याचे वडील या दोघांनी मिळून अभिनेत्याचं हे नाव ठेवलं होतं. मात्र आता त्याला संपूर्ण जग सलमान खान, सल्लू किंवा भाईजान या नावाने ओळखते.

कसा मिळाला पहिला चित्रपट ?

आज सलमान जरी एक मोठा सुपरस्टार असला तरी सुरुवातीच्या काळात त्याला खूपट संघर्ष करावा लागला. बरच स्ट्रगल केल्यानंतर त्याला पहिला ब्रेक मिळाला आणि काम करण्याची संधीही मिळाली. बऱ्याच जणांना माहीत नसेल पण सलमानने सुरूवातील असिस्टंट डिरेक्टर ( सहाय्यक दिग्दर्शक) म्हणून काम केले होते. तो चित्रपट 1988 मध्ये रिलीज झाला होता. पण दुर्दैवाने हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला.

ब्रेसलेट आहे लकी चार्म

सलमान खानच्या चाहत्यांना त्याच्या प्रत्येक गोष्टीबद्दल माहीत असते. त्याच्या हातात नेहमीच एक ब्रेसलेट असते. सलमान नेहमीच ते निळ्या रंगाचे ब्रेसलेट घालतो. एवढंच नव्हे तर तो त्या ब्रेसलेटला एकदम लकी चार्म मानतो. सलमानला हे ब्रेसलेट त्याला त्याच्या वडिलांनी 2002 मध्ये दिले होते. खुद्द सलमाननेच हा खुलासा केला होता. तेव्हापासून तो नेहमी ते ब्रेसलेट घालताना दिसतो.