Salman khan Firing : सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, 5 व्या आरोपीला अटक; राजस्थान कनेक्शन काय ?

| Updated on: May 07, 2024 | 11:20 AM

अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घरावर १४ एप्रिल रोजी गोळीबार झाल्याने मोठी खळबळ माजली होती. या प्रकरणात एक अपडेट समोर आले आहेत. सलमानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात 5 व्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

Salman khan Firing : सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, 5 व्या आरोपीला अटक;  राजस्थान कनेक्शन काय ?
Follow us on

अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घरावर १४ एप्रिल रोजी गोळीबार झाल्याने मोठी खळबळ माजली होती. या प्रकरणात नवनवे अपडेट्स रोज समोर येत आहेत. या गोळीबार प्रकरणातील एका आरोपीने गेल्या आठवड्यात तुरूंगातच आत्महत्या केल्याने एकच खळबळ माजली होती. आता आणखी एक नवे अपडेट समोर आले आहे.  सलमानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात 5 व्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

मोहम्मद चौधरी असे आरोपीचे नाव असून त्याला राजस्थानवरून अटक करण्यात आली आहे. सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांना मदत केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. काही वेळातच गुन्हे शाखेचे पथक आरोपीला घेऊन मुंबईत येणार आहे, अशी माहिती मिळत आहे.

रविवार, १४ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास वांद्रे येथील गॅलॅक्सी अपार्टमेंटमधील सलमानच्या घरावर गोळीबार करण्यात आली. त्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले. मात्र गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी कसून तपास करत दोन दिवसांच्या आत गुजरातच्या भुज येथून सागर पाल आणि विक्की गुप्ता या दोन्ही आरोपींना अटक केली. बिश्नोई गँगने या गोळीबाराची जबाबदारी घेतली होती. लॉरेन्स बिश्नोईचा छोटा भाऊ अनमोलने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. पोलिसांनी त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली.

हे सुद्धा वाचा

एका आरोपीने केली आत्महत्या

त्यानंतरही पोलिसांकडून तपास सुरूच होता. पोलिसांनी याप्रकरणी आणखी दोघांना अटक केली. एकूण चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दोन्ही शूटर्सना पिस्तुल पुरवल्याप्रकरणी पोलिसांनी पंजाब येथून सोनू चंदर आणि अनुज थापन या दोघांनाही बेड्या ठोकल्या. त्या चौघांनाही न्यायालयसमोर हजर करण्यात आले असता त्यांची तुरुंगात रवानगी झाली. त्यापैकी एक आरोपी अनुज थापन याने गेल्या आठवड्यात जेलमध्ये असतानाच गळफास लावून आयुष्य संपवलं. त्यामुळे एकच खळबळ माजली होती.

पाचवा आरोपी कोण ? 

मात्र एवढ्या घडामोडींनतरही गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास अद्याप कायम ठेवला असून आता या गोळीबार प्रकरणातील पाचव्य आरोपीला राजस्थानमधून बेड्या ठोकण्यात आल्याचे समजते. मोहम्मद चौधरी याने सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या विकी आणि सागर यांना पैसे पुरवले आणि सलमानच्या घराची तसेच फार्महाऊसची रेकी करण्यास मदत केली होती, अशी माहिती समोर आली आहे. गुन्हे शाखेचे पथक त्या आरोपीला लवकरच मुंबईत येणार असल्याचेही माहिती मिळत आहे.

हल्ल्याआधी घराची आणि फार्महाऊसची केली रेकी

मुंबई गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल रोजी गोळीबार करण्याआधीच शूटर्सनी चार वेळा सलमान खानच्या घराची रेकी केली होती. एवढंच नव्हे तर त्यांनी एकदा सलमानच्या पनवेल येथील फार्महाऊसवरही पाळत ठेवली होती. मात्र बऱ्याच काळापासून सलमान फार्महाऊसवर आलाच नव्हता त्यामुळे हल्लेखोरांनी त्याच्या वांद्रे येथील घरावरच गोळीबार करण्याचा प्लान आखला.

दोन्ही आरोपींनी गुन्ह्यांत वापरलेले पिस्तुल हे मुंबईत आल्यावर अज्ञात व्यक्तींकडून पुरवण्यात आले होते. तर खर्चासाठी लागणारे पैसेही अनोळखी व्यक्तीने दिले होते. त्याचबरोबर घर भाड्याने घेण्यासाठी अनोळखी व्यक्तीने मध्यस्थी केली होती. सलमान खानच्या घरावर गोळीबार होण्याच्या काही तास आधी शूटर्सना बंदूक पुरवण्यात आली होती. या बंदुकीचा पुरवठा 13 एप्रिलच्या रात्री वांद्रे भागात करण्यात आला आणि 14 एप्रिलच्या पहाटे दोन्ही शूटर्सनी सलमानच्या घरावर गोळीबार केला.