माजी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येला जवळपास आठवडा होत आला आहे. शनिवारी रात्री त्यांची वांद्रे येथे गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. यामुळे महाराष्ट्रच नव्हे अख्खा देश हादरलाय. सिद्दीकी यांचे बॉलिवूडमध्येही अनेकाँशी सख्य होते. अभिनेता सलमान खान तर त्यांचा खूप जवळचा मित्र. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली. याच लॉरेनस्चे सलमानशी असलेलेल वैरही जगजाहीर आहे. त्यातच सलमानचे खास मित्र असलेल्या बाबा सिद्दीकी यांचीही निर्घृण हत्या झाल्याने तो हादरला असून सलमानच्या सुरक्षेत कडकोट वाढ करण्यात आली आहे.
याचदरम्यान आता एक नवी अपडेट समोर आली आहे. सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईच्या नावे पन्हा धमकी देण्यात आली आहे. सलमानसोबत असलेले भांडण संपवण्यासाठी लॉरेन्स गँगने 5 कोटी रुपयांची मागणी केल्याचे वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोईसोबतचे दीर्घकाळचे वैर संपवण्यासाठी अभिनेता सलमान खानकडे 5 कोटींची मागणी करणारा धमकीचा संदेश मुंबई ट्राफिक पोलिसांना मिळाला आहे. हा मेसेज पाठवणाऱ्या तर्फे आपण लॉरेन्स गँगचा सदस्य असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
A threatening message has been received on the WhatsApp number of Mumbai Traffic Police, in which Rs 5 crore has been demanded from actor Salman Khan. The sender claimed, “Don’t take it lightly, if Salman Khan wants to stay alive and wants to end the enmity with Lawrence Bishnoi,…
— ANI (@ANI) October 18, 2024
ट्रॅफिक पोलिसांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲपद्वारे पाठवण्यात आलेल्या या मेसेजमध्ये सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘ लॉरेन्स बिश्नोईसोबतचं वैर संपवण्यासाठी समलानकडून 5 कोटी मागितले आहे. हा मेसेज हलक्यात घेऊ नका, अन्यथा सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकींपेक्षा खूप वाईट होईल’, असा इशाराही या धमकीच्या मेसेजमध्ये देण्यात आला. मात्र या मेसेजमुळे एकच खळबळ माजली असून सुरक्षा एजन्सींमध्ये चिंता वाढली आहे. सलमानचे चाहतेही या बातमीमुळे चिंतेत आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
सलमानच्या सुरक्षेत वाढ
शनिवार 12 ऑक्टोबर रोजी वांद्रे येथील निर्मलनगरमध्ये बाबा सिद्दीकी यांची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमानच्या सुरक्षेसाठी जवळपास 100 मुंबई पोलिसचे जवान तैनात करण्यात आले आहेत. त्यापैकी काही पोलीस हे सिव्हील ड्रेसमध्ये आहेत. वांद्र्यातील सलमानच्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट्स’बाहेर 24 तास पोलिसांचा पहारा आहे. सीसीटीव्हीच्या मदतीनेही सुरक्षेवर कडक नजर ठेवली जात आहे. बँडस्टँड आणि गॅलेक्सी अपार्टमेंट्सजवळ 60 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी सामान्य कपड्यांमध्ये तैनात करण्यात आले आहेत. या परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती आढळते का किंवा काही संशयास्पद घडतय का याकडे पोलिसांचं बारकाईने लक्ष आहे. याशिवाय मुंबई पोलिसांनी फेशिअल रेकग्निशन (चेहऱ्याची ओळख) तंत्रज्ञानासह AI सक्षम हाय रिझोल्युशन सीसीटीव्ही कॅमेरे वापरले आहेत. एखादी व्यक्ती वारंवार एकाच ठिकाणी आढळून आल्यास पोलीस अधिकाऱ्यांना सावध करण्यासाठी हे कॅमेरे डिझाइन करण्यात आले आहेत.