Salman Khan | भाईजान, तुझा नंबर कधी ? अरबाजच्या लग्नात सलमानला चाहत्यांचा सवाल

| Updated on: Dec 25, 2023 | 12:02 PM

अभिनेता अरबाज खानने रविवारी 24 डिसेंबर रोजी दुसऱ्यांदा लग्न केलं. मेकअप आर्टिस्ट शुरा खान आणि अरबाज यांचा निकाह प्रियजनांच्या उपस्थितीत पार पडला. या विवाहासाठी अरबाजचा भाऊ आणि अभिनेता सलमान खानही उपस्थित होता. त्याचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला. मात्र त्यावर नेटकऱ्यांनी सलमानला लग्नाबद्दल प्रश्न विचारला आहे.

Salman Khan | भाईजान, तुझा नंबर कधी ? अरबाजच्या लग्नात सलमानला चाहत्यांचा सवाल
Image Credit source: social media
Follow us on

मुंबई | 25 डिसेंबर 2023 : अभिनेता अरबाज खानने रविवारी 24 डिसेंबर रोजी दुसऱ्यांदा लग्न केलं. मेकअप आर्टिस्ट शुरा खान आणि अरबाज यांचा निकाह मोजक्या, जवळच्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी बॉलिवूडमधील काही मोजके सेलिब्रिटीदेखील उपस्थित होते. त्याच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. अनेक इनसाईड फोटोही समोर येत आहेत.

अरबाजने त्याच्या वधूसोबत पहिला पोटो शेअर केला. अरबाजची बहीण अर्पिता खन हिच्या घरी पार पडलेल्या या विवाहासाठी अरबाजचा भाऊ आणि अभिनेता सलमान खानही उपस्थित होता. त्याचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.

या व्हिडीओमध्ये सलमान खान लग्नाच्या फंक्शननंतर कारमधून बाहेर पडताना दिसत आहे. त्यातील सलमानच्या सिंपल लूकमुळे सगळेच त्याचे कौतुक करत आहेत. त्यावर अनेक कमेंट्स आल्या आहेत आणि नेटकऱ्यांनी सलमानला एक प्रश्नही विचारला आहे. ‘भाईजान तुझा नंबर कधी’ असं अनेकांनी त्यावर विचारलं आहे.

सिंपल लूकमध्ये सलमानने जिंकली चाहत्यांची मनं

अरबाज खान आणि शूरा खानच्या लग्नानंतर सलमान खानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान अगदी सिंपल लूकमध्ये दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये सलमान खानने कुर्ता-पायजमा घातलेला दिसत होता. सलमान खानचा हा साधा लूक सोशल मीडियावर येताच लोकप्रिय झाला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सलमान खान लग्नाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर बाहेर येताना दिसत आहे. यावेळी सलमान खानसोबत मोठा सुरक्षा ताफाही दिसला. सलमान खानचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात शेअर केला आहे.

इथे पहा व्हिडीओ

 

लग्नाबद्दल चाहत्यांचा सलमानला सवाल

सलमान खानच्या या व्हिडिओवर लोकांनी विवध कमेंट केल्या आहेत. त्याचे कौतुक करतानाच, लोकांनी त्याला लग्नाबद्दलही सवाल विचारले आहेत. ‘अरबाज खानने दुसरे लग्न केले आहे, भाईजना, तू पहिलं लग्न कधी करणार ?’, असा सवाल एका युजरने केला तर दुसऱ्या यूजरने लिहिले की ‘आता तुलाही लग्न करावसं वाटत असेल’. याशिवाय अनेक यूजर्स सलमान खानला त्याच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारताना दिसले.

अरबाजची पत्नी शुरा खान, आहे तरी कोण ?

मलायकाशी घटस्फोट झाल्यानंतर अरबाज खान पर्सनल लाईफमुळे सतत चर्चेत होता. तो गेल्या काही वर्षांपासून मॉडेल जॉर्जिया अँड्रियानीला डेट करत होता. मात्र आमचं ब्रेकअप झालं असा खुलासा काही दिवसांपूर्वीच जॉर्जियाने एका मुलाखतीत केला. त्यानंतर अचानक आता अरबाज आणि शुराच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आणि 24 डिसेंबरला त्यांनी लग्न केलं. ‘पटना शुक्ला’ या नव्या चित्रपटाच्या सेटवर अरबाज खानची ओळख मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी झाली. शुरा ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आहे. तिने अभिनेत्री रवीना टंडन आणि तिची मुलगी राशा थडानीसाठी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केलं आहे.

 

सलमान खान याची बहीण अर्पिता खान हिच्या घरी अरबाज आणि शूरा यांचा निकाह पार पडला. निकाहसाठी अनेक सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती. रविना टंडन, तिची लेक राशा , रितेश देशमुख, जेनेलिया डिसूजा यांच्यासह अनेकजण नवदांपत्याला शुभेच्छा देण्यासाठी आले होते.