सर्वांचा लाडका भाईजान अर्थात दबंग स्टार सलमान खान याचं लग्न कधी होणार, त्याला जोडीदार कधी मिळणार हा प्रश्न त्याच्या लाखो चाहत्यांच्या मनात सतत असतो. त्याबद्दल सलमानला बरेच वेळा प्रश्नही विचारण्यात आला आहे. मात्र तो कधी लग्न करणार याबद्दल काहीच बोलत नाही आणि आता तो कधी लग्न करेल अशी शक्यताही दिसत नाहीये. मात्र याचा अर्थ असा नव्हे की सलामनने कधी लग्नाबद्दल विचारच केला नाही. एकेकाळी सलमानच नाव अनेक तरूणींशी, अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं.
अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांच्या प्रेमप्रकरणाबद्दल तर सर्वांनाच माहीत आहे. हम दिल दे चुके सनम चित्रपटाच्या सेटवर दोघांची भेट झाली आणि चित्रीकरणादरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. नंतर बराच काळ ते एकत्र होते, पण त्यांच्यातील मतभेद आणि भांडण टोकाला गेली आणि दोघांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर ऐश्वर्या आणि सलमान दोघेही अनेक लोकांसोबत रिलेशनमध्ये होते. ऐश्वर्याने अभिनेता अभिषेक बच्चन याच्याशी लग्न केले आणि त्या दोघांना आराध्या नावाची एक गोड लेकही आहे. पण सलमान अजूनही अविवाहीत आहे.
मात्र ऐश्वर्याच्या प्रेमात पडण्यापूर्वीच सलमानला एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता आणि त्याला तिच्याशीच लग्न करण्याची इच्छा होती, हे तुम्हाला माहीत आहे का ? कोण होती ती अभिनेत्री ?
या अभिनेत्रीच्या घरी पाठवला होता विवाहाचा प्रस्ताव
सलमान खानच्या वैयक्तिक आयुष्याची कहाणी चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. त्याच्या आयुष्यात अनेक अभिनेत्री आल्या आणि गेल्या, ज्यांच्याशी सलमानचे नाव जोडले गेले. पण 90 च्या दशकातील सुपरस्टार जुही चावला ही अभिनेत्री होती जिच्याशी सलमान खानला लग्न करण्याची इच्छा होती. 1992 मध्ये एका मुलाखतीत, सलमान या प्रकरणावर खुलेपणाने बोलला होता. तो म्हणाला- मला तिच्याशी लग्न करायचे आहे, ती खूप छान आहे. पण तिचे वडील यासाठी तयार नाहीत, मी त्यांच्याशीही या विषयावर बोललो आहे, पण त्यांना काय हवे आहे ते मला माहीत नाही, ते या लग्नासाठी तयार नाहीत,असं सलमानने नमूद केलं. अशाप्रकारे सलमानने जुही चावलासोबत लग्नाबाबतच्या आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. यानंतर बिग बॉस शोमध्येही सलमानने जुहीसमोर याचा खुलासा केला होता. 1995 मध्ये जुही चावलाने बिझनेसमन जय मेहताशी लग्न केलं.
या चित्रपटात एकत्र केलं काम
खरंतर 90च् दशकातील नामवंत अभिनेत्री असलेल्या जुहीने शाहरुख खान, आमिर खान यांच्यासह अनेक हिट चित्रपटात काम केलं. पण सलमानसोबत ती एकाच चित्रपटात झळकला. तेव्हा प्रदर्शित झालेल्या दिवाना मस्तान चित्रपटात जुहीची प्रमुख भूमिका होती आणि सलमानचा गेस्ट अपिअरन्स होता. त्यानंतर त्या दोघांनी कोणत्याही चित्रपटात एकत्र काम केलं नाही.