सलमान घेतोय सुनिल ग्रोव्हर काळजी, डॉक्टरांची टीम पाठवली निगराणीसाठी; चाहत्यांकडून कौतुक

| Updated on: Feb 06, 2022 | 9:27 AM

सुनिल ग्रोव्हरने आत्तापर्यंत आपल्या कॉमेडीच्या जोरावर देशात लाखो फॅन्स तयार केले आहेत. तसेच तो त्याच्या सोशल मीडियावर सुध्दा नेहमी सक्रीय असतो.

सलमान घेतोय सुनिल ग्रोव्हर काळजी, डॉक्टरांची टीम पाठवली निगराणीसाठी; चाहत्यांकडून कौतुक
सलमान खान आणि सुनिल ग्रोव्हर (फाईल फोटो)
Follow us on

मुंबई – बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (salman khan) नेहमी वेगळ्या कारणासाठी चर्चेत असतो. त्याचा तसा तगडा फॅनवर्गही आहे. त्याने केलेली कोणतीही गोष्ट त्याच्या फॅनला प्रचंड आवडते. तो नेहमी त्याच्या चाहत्यांच्या सोशल मीडियाच्या (social media) माध्यमातून संपर्कात असतो. त्यामुळे सलमानने केलेली प्रत्येक गोष्ट त्याच्या चाहत्यांना माहित असते. सलमान खानने आत्तापर्यंत त्याच्या अनेक मित्रांना मदत केली असल्याची उदाहरणं आहेत. नुकतीच सुनील ग्रोव्हर (sunil grover) याचं ऑपरेशन झाल्याचं समजताच सलमानच्या मदतीला धावून गेला असल्याचं समजतंय. सुनिल गोव्हरची अचानक सर्जरी झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. परंतु तो ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. सद्या सुनिल ग्रोव्हर त्याच्या घरी आराम करीत असून सलमान खानने त्याची डॉक्टरांची टीम सुनिलच्या तपासणीसाठी पाठवली असल्याचं समजतंय.

काळजीपोटी पाठवली डॉक्टरांची टीम

सुनिल ग्रोव्हरचा हा सलमान खानचा चांगला दोस्त असल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. तसंच दोघांची दोस्ती चांगली असल्यामुळे सलमान सुनिल ग्रोव्हरचं ऑपरेशन झाल्यापासून फार चिंतेत होता, सुनिलचं ऑपरेशन सुरू झाल्यापासून तो डॉक्टरांच्या संपर्कात होता. तसेच वारंवार डॉक्टरांना फोनकरून त्याने चौकशी सुध्दा केली असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे या दोघांची किती जिगरी दोस्ती आहे स्पष्ट होतं. ऑपरेशन नंतर घरी गेलेल्या सुनिल ग्रोव्हरची तब्येत सध्या ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं असलं तरी सलमान खानने त्याचे खास डॉक्टर सुनिल ग्रोव्हर यांची तपासणी करण्यासाठी पाठवली आहे.

अचानक त्रास झाल्याने करावं लागलं ऑपरेशन

सुनिल ग्रोव्हरने आत्तापर्यंत आपल्या कॉमेडीच्या जोरावर देशात लाखो फॅन्स तयार केले आहेत. तसेच तो त्याच्या सोशल मीडियावर सुध्दा नेहमी सक्रीय असतो. छातीत दुखत असल्याने त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु डॉक्टरांनी त्याला तातडीने ऑपरेशन करण्याचं सांगण्यात आलं, कारण परिस्थिती बिघडू नये यासाठी डॉक्टरांनी योग्य सल्ला दिला होता. त्यामुळे सुनिल ग्रोव्हरने तातडीने ऑपरेशन करून घेतले. ज्यावेळी सुनिल ग्रोव्हरला कोरोना झाला होता, त्यावेळी सुध्दा सलमान खानने आपली टीम सुनिलच्या घरी पाठवली होती, तसेच सुनिल कोरोनातून बरा होईपर्यंत काळजी घेतली होती. त्यामुळे सलमानचं चाहत्यांकडून कौतुक केलं जात आहे.

Nora Fatehi Birthday : कॅनेडियन डान्सर ते बॉलिवूडची टॉप आयटम गर्ल, कसा आहे अभिनेत्री नोरा फतेहीचा प्रवास? जाणून घ्या…

Abhishek Bachchan Birthday : वाढदिवसाच्या दिवशी अभिषेक बच्चनला सर्वाधिक सुंदर गिफ्ट, फोटो पोस्ट करत म्हणाला…

अभिनेत्री मृणाल दुसानिसच्या घरी येणार चिमुकला पाहुणा, इन्स्टाग्रामवरुन दिली माहिती