2024 मध्ये अशी अनेक जोडपी आहेत ज्यांनी त्यांचे नाते कायमचे संपवले. म्हणजे अनेक जोड्यांचे घटस्फोट झाले. त्यात दलजीत कौर आणि निखिल पटेल, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलिया सिद्दीकी, उर्मिला मातोंडकर आणि मोहसीन अख्तर मीर, ईशा देओल आणि भरत तख्तानी, धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत, सानिया मिर्झा आणि शोएब मलिक ते हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅन्कोविकपर्यंत, अशी अनेक नावे आहेत ज्यांनी 2024 मध्ये त्यांचे नाते संपवले. आता युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. धनश्रीला पोटगी म्हणून 4.75 कोटी रुपये देण्यात आले. सोशल मीडियावर पोटगीवरून एक नवीन वाद सुरू झाला आहे.
दोघांचे लग्न म्हणजे चाहत्यांसाठी सोहळाच होता
पण एक जोडी अशी आहे ज्यांचा घटस्फोट 2021 झाला आहे पण त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा आजही होतात आणि त्याबद्दल आजही चाहत्यांना वाईट वाटतं. ही लोकप्रिय जोडी म्हणजे समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य.या दोघांची त्यांची प्रेमकहाणी 2010 मध्ये सुरू झाली. 7 वर्षे एकमेकांना समजून घेतल्यानंतर, त्यांनी 2017 मध्ये लग्न केलं आणि यावर्षी त्यांचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. हे लग्न म्हणजे दोघांच्याही चाहत्यांसाठी मोठा सोहळाच होता.
पण नंतर अचानक दोघांच्या घटस्फोटाच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला. दोघांनीही एकमेकांबद्दल आदर दाखवला आणि त्यांच्या आयुष्यात वैयक्तिकरित्या पुढे जाण्याचा निर्णय घेतला. मात्र नक्की त्यांच्यात कोणत्या गोष्टीवरून एवढा वाद झाला की त्यांनी थेट घटस्फोटाचा निर्णय घेतला.हे अजून समोर आलेलं नाही.पण त्यासाठी चैतन्यला जबाबदार धरण्यात आलं.
संमांथाने पोटगीची मोठी रक्कम नाकारली
या दोघांचा घटस्फोट झाला तेव्हा संमांथाला पोटगीची मोठी रक्कम देऊ केली होती. 200 कोटी रुपये तिला देऊ केले होते. मात्र तिने पोटगी घेण्यास स्पष्ट नकार दिला होता. ती भारतातील एकमेव अभिनेत्री असेल जिने तिच्या सुपरस्टार पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर कोट्यवधी रुपयांचे पोटगीचे पैसे नाकारले.
समांथाला बाळ हवे होते
बाळ नियोजनाच्या बातम्यांदरम्यान घटस्फोटाची बातमीही आली, असेही सांगण्यात येत की नागा चैतन्यपासून घटस्फोट घेण्यापूर्वी समांथा बेबी प्लानिंग करत होती. तिला बाळ हवं होतं. एका रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेत्रीला 50 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, परंतु तिने ते पैसेही स्वीकारण्यासही नकार दिला.
“नो मॅरेज, नो मनी”
या घटस्फोटामुळे समांथा खूप निराश झाली होती. असे म्हटले जाते की तिने पोटगी नाकारली कारण तिला फक्त प्रेम आणि नागाचैतन्यची साथ हवी होती.जेव्हा त्यांचे नाते संपले तेव्हा तिने हे पैस वैगरे काहीच घेण्यास नकार दिला. घटस्फोटानंतर समंथाने तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित केले आणि तिने अनेक जबरदस्त चित्रपट केले. तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आणि एक यशस्वी अभिनेत्री म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. घटस्फोटानंतर वयाच्या 37 व्या वर्षीही समांथा अजूनही सिंगलच आहे. तर नागा चैतन्यने शोभिता धुलिपालाशी दुसरे लग्न केले आहे.