सकाळी नागा चैतन्याची दुसऱ्या लग्नाची हळद अन् आता समांथाच्या वडिलांच्या निधनाची बातमी; अभिनेत्रीसह चाहत्यांनाही धक्का

| Updated on: Dec 02, 2024 | 2:12 PM

प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू यांच्या वडिलांना जोसेफ प्रभू यांचे निधन झाले आहे. या दुःखद बातमीने समांथा आणि तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर चाहत्यांकडून समांथाला भरपूर सांत्वन करताना दिसत आहेत.

सकाळी नागा चैतन्याची दुसऱ्या लग्नाची हळद अन् आता समांथाच्या वडिलांच्या निधनाची बातमी; अभिनेत्रीसह चाहत्यांनाही धक्का
Follow us on

अभिनेत्री समांथा रुथ प्रभूचे वडील जोसेफ प्रभू यांचे आज (29 नोव्हेंबर 2024) निधन झाले आहे. या दु:खद बातमीची माहिती समांथाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केली आहे.

वडिलांच्या निधनामुळे समांथा कोलमडली

समांथाला तिच्या वडिलांच्या निधनामुळे नक्कीच मोठा धक्का बसला आहे. वडिलांच्या निधनानंतर समांथाने पोस्ट शेअर करत “पुन्हा भेट होईपर्यंत बाबा…” असं लिहित तुटलेल्या हृदयाचा इमोजी टाकला आहे. समांथाच्या आयुष्यात एकामागोमाग एक वाईट गोष्टी घडत चालल्या आहेत. एका वाईट घटनेतून सावरते ना सावरते तोच नवी वाईट घटना तिच्यासोबत घडत आहे.

समांथाला ‘मायोसिटीस’ नावाच्या गंभीर आजाराने ग्रासले आहे. तसेच तिचा आणि नागा चैतन्य यांचा घटस्फोट आणि आता तिची खंबीर आधार असणाऱ्या तिच्या वडिलांचे निधन. तिच्या पोस्टनंतर तिच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. समांथाचे चाहते सोशल मीडियावर समांथाच्या सांत्वनासाठी पोस्टही करीत आहेत.

वडील म्हणजे खंबीर आधार  होते 

समांथाचे वडील, तेलुगू अँग्लो-इंडियन होते. समांथाच्या आयुष्यात आणि तिच्या जडणघडणीत तिच्या वडिलांचा मोठा वाटा होता. समांथा तिच्या वडिलांबद्दल नेहमीच भरभरून बोलत असे. मनोरंजन क्षेत्रातील प्रवासात त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल ती नेहमी कृतज्ञता व्यक्त करायची. तसेच तिने तिच्या वडिलांशी असलेल्या नात्याबद्दल वक्तव्य केले होते. एका माध्यमाला दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या वडिलांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.

दरम्यान आजच म्हणजे 29 नोव्हेंबरला नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा हळदी समारंभ पार पडला. नागा चैतन्य आणि समांथाचा घटस्फोट झाल्यानंतर दोघेही आपल्या आयुष्यात पुढे निघून गेले. त्यातच नागा चैतन्यने त्याच्या आयुष्याची नवी सुरुवात ही अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत केली. काही दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा झाला तर आज त्यांची हळद आणि 4 डिसेंबरला त्यांचे लग्न होणार आहे.

समांथाचा घटस्फोट जिव्हारी लागला होता.

आजच समांथाच्या पूर्वाश्रमीचा पती नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांची हळद झाली अन् आता समांथाच्या वडिलांच्या निधनाची बातमी समोर आली त्यामुळे अचानक समांथाचा खंबीर आधारच गेल्यानं तिला जास्तच धक्का बसला आहे.

दरम्यान ऑक्टोबर 2021 मध्ये समांथा आणि नागा चैतन्य हे विभक्त झाल्यानंतरही तिच्या वडिलांना हे मान्य होणारं नव्हतं. कारण त्यांनी त्यानंतर जवळपास एक वर्षानंतर समांथा व नागा चैतन्य यांच्या लग्नातील काही जुने फोटो फेसबुकवर शेअर करत याबद्दल खंत व्यक्त केली होती. या घटनेस स्वीकारायला त्यांना खूप वेळ लागला आणि त्यांनी नवीन अध्याय सुरू करण्याची आशाही व्यक्त केली होती.

आता समांथाने वडिलांच्या निधनाबद्दलची ही बातमी शेअर केल्यानतंर चाहत्यांकडून तिला नक्कीच सांत्वनाचा आधार मिळताना दिसतोय.