समंथा रुथ प्रभु हिचे फक्त साऊथमधील चित्रपटसृष्टीतच नव्हे तर संपूर्ण देशभरात आणि जगभरातही लाखो चाहते आहेत. तिचा अभिनय आणि बोल्ड अंदाज, बेधडक वक्तव्य असंख्य लोकांना आवडतात. मात्र समंथा तिच्या प्रोफेशनल आयुष्याप्रमाणचे पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असते. काही काळापूर्वी तिचा आणि दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्य यांचा घटस्फोट झाला. 2017 मध्ये त्यांचं धूमधडाक्यात लग्न झालं पण 2021 मध्ये ते वेगळे झाले. त्यांच्या या निर्णयामुळे चाहत्यांना बरंच दु:ख झालं, मात्र समंथा आणि नागा चैतन्य या दोघांनाही भूतकाळ मागे सोडून आता पुढे जायचं ठरवलं आहे, आणि मूव्ह ऑनही केलंय. नागा चैतन्य याने तर नुकताच अभिनेत्री सोभिता धुलिपाला हिच्यासोबत साखरपुडाही केला. 8 ऑगस्ट रोजी झालेल्या साखरपुड्यानंतर त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा झाली.
मात्र त्यांच्या साखरपुड्यानंतर त्या दोघांची नव्हे तर समांथाच जास्त चर्चेत असून तिचे काही जुने इंटरव्ह्यूदेखील पुन्हा व्हायरल झाले आहेत. अशाच एका मुलाखतीत समांथाने केलेल्या वक्तव्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. त्यामध्ये समांथा हिने जेवणापेक्षा सेक्स (शारीरिक संबंध) हा महत्वाचं असल्याचं म्हटलं होतं. तिचं नेमकं काय म्हणणं होतं, जाणून घेऊया.
जेवणच नाही तर सेक्सही महत्वाचा
एका मुलाखतीत समंथाला प्रश्न विचारण्यात आला होता की भोजन (अन्न) आणि सेक्स यापैकी एकाची निवड करावी लागली, तर तुझं उत्तर काय असेल ? त्यावर फार विचार न करता समांथाने प्रामाणिकपणे त्याचं उत्तर दिलं. ती म्हणाली ‘ मी जेवणाशिवाय, अन्नाशिवाय (उपाशी) राहू शकते, पण सेक्स ही अशी गोष्ट आहे, ज्याशिवाय ती राहू शकत नाही. ‘ तिच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या, त्याती बरीच चर्चाही झाली. मात्र आता हे वक्तव्य सध्या पुन्हा चर्चेत आलं आहे.
घटस्फोटनंतर निराश होता चैतन्य
नागा चैतन्य आणि सोभिता धुलीपाला यांचा साखरपुडा 8 ऑगस्ट रोजी झाला. नाग चैतन्यचे वडील आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते नागार्जुन यांनी स्वत:च या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली. ‘माझ्या मुलाला पुन्हा त्याचा आनंद मिळाला’ असेही ते म्हणाले. ‘ हा साखरपुडा खूप चांगल्या रितीने झाला. मी खूप खुश आहे. त्याच्यासाठी आणि आमच्या कुटुंबीयांसाठी मागचा काही काळ ठीक नव्हता. समंथासोबत घटस्फोट झाल्यानंतर तो ( नागा चैतन्य) खूप निराश झाला होता. माझा मुलगा त्याच्या भावना पटकन व्यक्त करत नाही, तो दाखवत नसला तरी तो खूप दु:खी आहे हे मला जाणवत होतं. त्याला पुन्हा आनंदी पाहणं, हसताना पाहणं माझ्यासाठी महत्वाच आहे. सोभिता आणि त्याची जोडी उत्तम आहे. त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे ‘असंही ते म्हणाले होते.