संजूबाबाची धक्काबुक्की, सेल्फी आणि… असं काय घडलं ?

| Updated on: Apr 30, 2024 | 10:44 AM

अभिनेता संजय दत्त हा बॉलिवूडच्या नामवंत अभिनेत्यांपैकी आहे. सध्या तो चित्रपटात फारसा दिसत नसला तरी चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. नुकताच अभिनेता संजय दत्त हा एअरपोर्टवर दिसला. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र याचदरम्यान  ‘संजू बाबा’ने असं काही केलं ज्यामुळे त्याला बऱ्याच टीकेचा, ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे

संजूबाबाची धक्काबुक्की, सेल्फी आणि... असं काय घडलं ?
Follow us on
अभिनेता संजय दत्त हा बॉलिवूडच्या नामवंत अभिनेत्यांपैकी आहे. सध्या तो चित्रपटात फारसा दिसत नसला तरी चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. नुकताच अभिनेता संजय दत्त हा एअरपोर्टवर दिसला. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र याचदरम्यान  ‘संजू बाबा’ने असं काही केलं ज्यामुळे त्याला बऱ्याच टीकेचा, ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. असं नेमकं काय झालं ?
एअरपोर्टवर संजय दत्त दिसल्यावर एका चाहता त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र संजय दत्त याने त्या चाहत्यालाचा धक्का दिला असून तो व्हिडीो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ समोर येताच संजय दत्त याच्यावर चहूबाजूंनी टीका होत असून अनेकांनी त्याच्या या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
खराब मूड ठरलं कारण 
संजय दत्त हा फोटो काढण्याच्या मूडमध्ये नव्हता, असे  व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. तो पापाराझींशीही बोलला नाही. विमानतळावर एका उत्साही चाहता त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी आला, मात्र त्या चाहत्याचा त्याला राग आला. संजय दत्तने त्याच्या फॅनला थेट दूर ढकललं. पण त्यानंतर तो फार रिॲक्ट झाला नाही , शांतपणे पुढे गेला आणि पटकन गाडीच्या दिशेने निघाला.
बेकायदेशीर स्ट्रीमिंगबाबत संजय दत्तची चौकशी 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजय दत्तला आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) 2023 च्या फेअर प्ले ॲपवर बेकायदेशीर स्ट्रीमिंगच्या संदर्भात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. ज्यामुळे वायाकॉमचे नुकसान झाले. संजय दत्त याला 23 एप्रिल रोजी महाराष्ट्र सायबर सेलसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. मात्र तेव्हा तो चौकशीसाठी तो हजर झाला नाही. त्याचा जबाब नोंदवण्यासाठी त्याने दुसरी तारीख आणि वेळ मागून घेतली.
संजय दत्तचे आगामी प्रोजेक्ट्स 
संजय दत्तच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच  रवीना टंडन, मिथुन चक्रवर्ती, सनी देओल आणि जॅकी श्रॉफ यांच्यासह ‘बाप’चित्रपटात झळकणार आहे. एवढंच नव्हे तर तो अक्षय कुमारच्या ‘वेलकम टू द जंगल’ मध्ये दिसणार आहे.  20 डिसेंबर 2024 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल अशी चर्चा आहे.