रोल किती आणि बोलतो किती; अक्षय खन्नाबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यामुळे संतोष जुवेकर ट्रोल

| Updated on: Mar 03, 2025 | 3:34 PM

'छावा' सिनेमामध्ये अभिनेता संतोष जुवेकरने भूमिका साकारली आहे. नुकताच त्याने सिनेमात औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाबाबत केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

रोल किती आणि बोलतो किती; अक्षय खन्नाबाबत केलेल्या त्या वक्तव्यामुळे संतोष जुवेकर ट्रोल
Santosh juvekar
Image Credit source: Social Media
Follow us on

गेल्या काही दिवसापासून एकाच चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचे नाव ‘छावा’ असे आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदाना येसुबाईंच्या भूमिकेत दिसत आहे आणि अभिनेता अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटात काही मराठी कलाकार दिसले आहे. अभिनेता संतोष जुवेकरने रायाजी या भूमिकेत दिसत आहे. त्याने एका मुलाखतीमध्ये ‘मी अक्षय खन्नाशी बोललोच नाही’ असे म्हटले. त्यानंतर संतोष जुवेकरला ट्रोल केले जात आहे.

काय म्हणाला होता संतोष जुवेकर?

संतोष जुवेकरने एका वृत्तवाहिनीला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने शुटिंगचा अनुभव सांगितला. त्यावेळी तो म्हणाला, “छावा सिनेमात ज्यांनी मुघलांच्या भूमिका साकारल्या आहेत त्या कोणाशीच मी बोललो नाही. शूटिंग सुरु असताना मी तरी त्यांच्याशी बोललो नाही. औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नाच्या काही सीन्सचे शूटिंग सुरू असताना मी लक्ष्मण सरांना भेटायला गेलो होतो. मी सरांना भेटलो, बोललो आणि निघालो. बाजूला अक्षय खन्ना बसला होता. पण, मी त्याच्याकडे बघितलंपण नाही. माझा काही अक्षय खन्नावर राग नाही. त्याने उत्तमच काम केलं आहे. पण, माहीत नाही का त्यांच्याशी बोलावंसंच मला वाटलं नाही.”

हे सुद्धा वाचा

नेटकऱ्यांनी केले ट्रोल

नेटकऱ्यांनी संतोष जुवेकरची ही मुलाखत पाहिली. या मुलाखतीमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे नेटकऱ्यांनी संतोषला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. ‘आपला रोल किती आणि आपण बोलतो किती. किती अतिशयोक्ती… अक्षय खन्ना पेक्षा हाच जास्त इंटरव्ह्यू देतोय’ असे एका यूजरने म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट करत ‘रुबाब केवढा रोल केवढा’ असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने ‘माझीच लाल मित्रमंडळ.. नुसतीच फुगिरी’ अशी कमेंट केली आहे.