मुंबई : हरियाणवी डान्सर आणि गायिका सपना चौधरीचे (Sapna Choudhary)देशभरात लाखो चाहते आहेत. ती नुकतंच आई झालीये त्यामुळे तिचे चाहते तिची परत येण्याची वाट पहात होते. सपनानं प्रेक्षकांना निराश केलेलं नाही आणि प्रसूतीनंतर तिच्या सोशल मीडिया अकाऊंवर एक व्हिडीओ (Dance Video) शेअर केला. मात्र लोक तिला स्टेजवर पाहू इच्छित होते. अखेर सपनानं तीसुद्धा इच्छा पूर्ण केली. या डान्सचा स्टेज परफॉरमन्स व्हिडीओ तिनं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.
सपना चौधरीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टेज शोचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. लोकांना सपनाचा हा व्हिडिओ प्रचंड आवडलेला दिसतोय. या व्हिडीओमध्ये पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान करुन ती दणक्यात नाचताना दिसत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सपना आई झाल्यानंतर पहिल्यांदाच स्टेजवर दिसली. यामुळे चाहते अधिक उत्साही होते.
पहिल्याच गाण्यानं बनवलं सुपरस्टार
सपना चौधरीला तिच्या पहिल्याच गाण्यानं सुपरस्टार बनवलं होतं. ‘सॉलिड बॉडी’ हे तिचं पहिलं गाणं हों. या गाण्यानंतर तिचे कोट्यावधी फॉलोअर्स झाले. ती लोकांमध्ये इतकी लोकप्रिय आहे की 2017 मध्ये सपना चौधरी गुगलनं जाहीर केलेल्या टॉप एन्टरटेनरच्या यादीत तिसर्या क्रमांकावर पोहोचली. या यादीमध्ये तिनं विद्या वोक्स आणि दिशा पटानी यासारख्या सेलिब्रिटींनाही मागे टाकलं होतं. सपना लोकप्रिय बिग बॉस या रियलिटी शोमध्येही झळकलेली.
वीर साहूसोबत बांधली लग्नगाठ
सपना चौधरीनं मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात हरियाणवी गायक, संगीतकार, लेखक, निर्माता वीर साहू याच्याशी लग्न केलं होतं.
संबंधित बातम्या
Drishyam 2 Movie Review : ‘पटकथेतल्या कथेचा बाप खेळ’, दृश्यम 2 कसा आहे?