बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी पहाटे (16 जानेवारी, 2025) मुंबईतील त्याच्या वांद्रे पश्चिम येथील निवासस्थानावर एका अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सैफवर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तसेच आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
दरम्यान या घटनेनंतर अनेक सेलिब्रिटींपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांनी हा प्रकार धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे. सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचंही त्यांनी म्हटल आहे. दरम्यान ही घटना समजताच अनेकजण हॉस्पिटलमध्ये सैफची विचारपूस करण्यासाठी गेल्याचही समोर आलं आहे.
सारा आणि इब्राहिमची अस्वस्थता कॅमेऱ्यात कैद
सैफला रुग्णालयात दाखल केल्यानंतर करीनाचाही एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती अतिशय घाबरलेल्या अन् गोंधळेल्या अवस्थेत दिसत आहे. तर आता सैफच्या दोन्ही मुलांचा म्हणजे सारा अली खान आणि इब्राहिम अली खान यांचाही हॉस्पिटलमधील एक व्हिडीओ समोर आला आहे.
#WATCH | Mumbai | Sara Ali Khan and Ibrahim Ali Khan arrive at Lilavati Hospital, where their father & actor Saif Ali Khan is admitted after an attack on him by an intruder in his Bandra home pic.twitter.com/OO6YuE0kTX
— ANI (@ANI) January 16, 2025
वडिलांच्या काळजीने लेक अन् मुलगा चिंतेत
या व्हिडीओमध्ये इब्राहिम आणि सारा घाई-घाईत आपल्या कारमधून उतरून धावत हॉस्पिटलच्या आत जाताना दिसत आहेत. दोघांच्याही चेहऱ्यावर वडिलांची काळजी आणि चिंता स्पष्टपणे दिसून येत आहे. तसेच या व्हिडीओवरून लेक अन् मुलगा वडिलांच्या काळजीने अस्वस्थ झाल्याचं दिसत आहे.
सैफला शरीरावर गंभरीर जखमा
दरम्यान सैफला शरीरावर 6 ठिकाणी गंभीर दुखापत झाली आहे. या हल्ल्यात त्याच्या मानेला, डाव्या मनगटाला, छातीला दुखापत झाली आणि चाकूचा एक छोटासा भाग त्याच्या पाठीतून काढण्यात आला होता. पाठीच्या कण्याला दुखापत झाल्यामुळे तातडीनं ऑपरेशन करावं लागलं. ऑपरेशन यशस्वी झालं असून त्याती प्रकृती आता स्थिर असल्याचं म्हटलं जात आहे.
मोलकरणीपासून ते घरातील इतर कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांची कसून चौकशी
तसेच हल्ला करणारा या अज्ञात व्यक्तीला शोधण्याचा पोलिस पूर्णपणे प्रयत्न करत आहे. तसेच इतरांचीही चौकशी सुरु आहे. मोलकरणीपासून ते घरातील इतर कर्मचाऱ्यांपर्यंत पोलिस सर्वांची कसून चौकशी करत आहेत. दरम्यान पोलिसांनी हा अज्ञात व्यक्ती चोरी करण्याच्या उद्देशानेच घरात घुसल्याचं सांगितलं आहे. तरी याबाबत अधिक तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.