एवढं सोपं कधीच नव्हतं… कार्तिक आर्यनसोबतच्या ब्रेकअपबद्दल सारा अली खानने सोडलं मौन

| Updated on: Nov 09, 2023 | 11:00 AM

'कॉफी विथ करण'च्या नव्या भागात अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेत्री अनन्या पांडे एकत्र आल्या होत्या. त्यावेळी साराने कार्तिक आयर्नसोबतचं नातं, ब्रेकअप याबद्दल पहिल्यांदाच भाष्य केलं.

एवढं सोपं कधीच नव्हतं... कार्तिक आर्यनसोबतच्या ब्रेकअपबद्दल सारा अली खानने सोडलं मौन
Follow us on

मुंबई | 9 नोव्हेंबर 2023 : करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा शो नेहमीप्रमाणेच खूप चर्चेत आहे. या शोच्या पहिल्या भागात दीपिका पडूकोण-रणवीर सिंग दिसले. त्यांनी त्याच्या पर्सनल आयुष्याबाबत अनेक खुलासे केल्याने त्या भागाची खूप चर्चा झाली होती. तर दुसऱ्या भागात सनी आणि बॉबी देओल आले होते. आता या शोचा तिसरा भागही लवकरच टेलिकास्ट होणार असून त्यामध्ये अभिनेत्री सारा अली खान (sara ali khan) आणि अनन्या पांडे (ananya pandey) या बीएफएफची जोडी एकत्र दिसली आहे.

या भागात अनन्या आणि साराने फक्त त्यांच्या प्रोफेशनल आयुष्याबद्दलच नव्हे तर पर्सनल आयुष्याबद्दलही अनेक गोष्टी शेअर केल्या. विशेष म्हणजे याच भागा अभिनेत्री सारा अली खान हिने पहिल्यांदाच अभिनेता कार्तिक आर्यनसोबतचं नातं आणि ब्रेकअप यांच्याबद्दल भाष्य केलं.

करणने विचारला तो प्रश्न 

खरंतर करण जोहरने यासंदर्भात साराला प्रश्न विचारला होता. ‘ तुम्ही दोघी मैत्रिणी आहात. एकत्र काम करत आहात. हे उत्तम आहे, कारण तुम्ही दोघींनीही एकाच अभिनेत्याला डेटही केलं होतं. तुमच्या दोघींचा एक एक्स-बॉयफ्रेंड कॉमन आहे. तुम्ही दोघींनीही कार्तिक आर्यनला डेट केलं आहे. त्याच्यासोबत तुम्ही एकदम चिल असता. एकमेकांसोबतही ( अनन्या-सारा) तुम्ही कम्फर्टेबल दिसता. हे तुमच्यासाठी सोपं होतं की कठीण ?’ असा प्रश्न करणने साराला विचारला होता.

 

साराने सोडलं मौन

त्यावर उत्तर देताना सारा म्हणाली ‘ते सोपं तर निश्चितच नव्हतं.’. ‘जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये असता, मग ती मैत्री असो, प्रोफेशनल काम असो किंवा रोमँटिक नातं असो. विशेषत: माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी एखाद्या नात्यात पूर्णपणे झोकून देते आणि त्यात (मानसिक) गुंतवणूकही करते. मला फरक पडत नाही असं तर मी म्हणू शकत नाही, पण तुम्हाला ते सगळं मागे सोडून पुढे जावच लागतं. आजची परिस्थिती वेगळी असू शकते आणि उद्या तर काही वेगळीच सिच्युएशन उद्भवू शकते. मी या व्यक्तीशी पुन्हा कधीच बोलणार नाही, किंवा त्या व्यक्तीला पुन्हा कधीच भेटणार नाही, असं एकाच इंटस्ट्रीमध्ये राहून तुम्ही म्हणू शकत नाही. असं सगळं होतं नाही. Never say Never ‘ अशा शब्दांमध्ये साराने तिच्या आणि कार्तिक आर्यनच्या ब्रेकअबद्दल बोलत चुप्पी तोडली.

सारा – अनन्याने कार्तिकला केलं होतं डेट

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन काही काळ एकमेकांना डेट करत होते. मात्र, काही काळानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर कार्तिक आणि अनन्या पांडेही काही रिलेशनशिपमध्ये होते. नंतर तेही वेगळे झाले. अनन्या सध्या आदित्य रॉय कपूरला डेट करत असल्याने चर्चेत आहे.