बाहुबलीमधील ‘कटप्पा’चा करिअरमधील 1978 पासूनचा खडतर प्रवास, अभिनेत्याचं खरं नाव जाणून घ्या!

| Updated on: Oct 03, 2023 | 11:56 PM

बॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट 'चेन्नई एक्सप्रेस'मध्ये काम केलं होतं. या चित्रपटात त्यांनी दीपिका पदुकोणच्या वडिलांची भूमिका साकारली होती. असे अनेक चित्रपट त्यांनी केले असून त्यांचा करिअरमधील सुरूवातीपासूनचा प्रवास जाणून घ्या.

बाहुबलीमधील कटप्पाचा करिअरमधील 1978 पासूनचा खडतर प्रवास, अभिनेत्याचं खरं नाव जाणून घ्या!
अभिनेते सत्यराज
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई :  बाहुबली हा चित्रपट चांगलाच गाजला होता. तसेच या चित्रपटाचा दुसरा भाग देखील सुपरहिट ठरला होता. या चित्रपटांना प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली होती. तर या चित्रपटातील कलाकार देखील चांगलेच प्रसिद्ध झाले. अभिनेता प्रभास सोबतच अभिनेते रंगराज सुब्बय्या उर्फ सत्यराज हे देखील चांगलेच प्रसिद्धीझोतात आले आहेत. बाहुबली चित्रपटात सत्यराज यांनी उत्कृष्ट पद्धतीने काम करत प्रेक्षकांचे मन जिंकलं. तर सत्यराज यांच्या करिअरबद्दल जाणून घ्या.

सत्यराज एक तमिळ अभिनेते आहेत, जरी ते तमिळ अभिनेते असले तरी त्यांनी हिंदी, तेलगू, मल्याळम या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. आतापर्यंत 200 हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. विशेष सांगायचं झालं तर सत्यराज यांनी बॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट ‘चेन्नई एक्सप्रेस’मध्ये काम केलं होतं. या चित्रपटात त्यांनी दीपिका पदुकोणच्या वडिलांची भूमिका साकारली होती.

सत्यराज यांचे वडील सुब्बायन हे डॉक्टर होते. त्यामुळे सत्यराज हे अभिनेते व्हावेत अशी सुब्बायन यांची इच्छा नव्हती. पण सत्यराज यांचं मन चित्रपटांच्या दुनियेतच होतं. त्यामुळे ते 1976 मध्ये घर सोडून चेन्नईला करिअर करण्यासाठी गेले. तर सत्यराज यांनी आतापर्यंत अनेक खलनायकाच्या भूमिका साकारलेल्या आपण पाहिले आहे. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवातच खलनायकाच्या पात्रापासून केली होती.

सत्यराज हे 1978 ते 1982 पर्यंत खलनायकाच्या भूमिकेत दिसले होते. त्यानंतर 1986 मध्ये ‘रासिगन ओरु रसीगाई’ या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर सत्यराज यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांनी फक्त खलनायकच नाही तर त्यांनि हिरोच्या भूमिका देखील साकारल्या तसेच त्यांनी कॉमेडी, रोमांटिक चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.

सत्यराज काही असे चित्रपट आहे जे सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरले आहेत. त्यांचे हे चित्रपट तुम्ही ओटीटीवर देखील पाहू शकता. यातील एक चित्रपट म्हणजे ‘वेधम पुथिथु’. हा चित्रपट 1987 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा एक ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन भारतीराजा यांनी केलं आहे. तर या चित्रपटात सत्यराज आणि अमला हे दोघे मुख्य भूमिकेत होते. सध्या हा चित्रपट प्राईम व्हिडिओवर उपलब्ध आहे.

‘विलाधी खलनायक’ हा चित्रपट सत्यराज यांनी स्वतः लिहिला आहे. तसंच त्यांनी हा चित्रपट दिग्दर्शित देखील केला आहे. हा चित्रपट 1995 मध्ये प्रदर्शित झाला होता. विशेष म्हणजे सत्यराज यांनी या चित्रपटात तीन वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.  त्यांचा हा चित्रपट देखील चांगला सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात एक रोड रोलर ड्रायव्हर स्थानिक लोकांसाठी कसा लढतो हे दाखवण्यात आलं आहे.

‘कदलोरा कवितागल’ हा सत्यराज यांचा चित्रपट सुपरहिट ठरला होता. 1986 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. विशेष म्हणजे या चित्रपटाचे तेलगूमध्ये ‘आराधना’ आणि कन्नडमध्ये देखील रिमेक करण्यात आला आहे. या चित्रपटात एक शिक्षिका एका गुंडाच्या प्रेमात पडते. त्यामध्ये शिक्षकेला वाटतं की  प्रेम हे माणसाला बदलते. तर या चित्रपटाची स्टोरी चांगलीच गाजली आहे.

सत्यराज यांच्या महत्त्वाच्या चित्रपटाबद्दल सांगयचं झालं तर ‘बाहुबली’. बाहुबली या चित्रपटात सत्यराज यांनी ‘कटप्पा’ची भूमिका साकारली आहे. कटप्पा हे पात्र चांगलंच गाजलं होतं. आजही लोक सत्यराज यांना कटप्पा म्हणूनच ओळखतात. कटप्पा या भूमिकेने सत्यराज यांना जगभरात प्रसिद्धी मिळाली.