आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांच्या मनाला मंत्रमुग्ध करणारी गायिका सावनी रविंद्र सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
नुकतंच सावनीनं शेअर केलेल्या फोटोंची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. सावनीनं डोहाळे जेवणाचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून तिनं चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे.
सोबतच ‘You + Me = Three ❤️? "#SavAsh Originals"’ असं सुंदर कॅप्शनही दिलं आहे.
तिनं पती डॉ. आशिष धांडे यांच्यासोबतचे काही फोटो शेअर करत. लवकरच आई होणार असल्याची बातमी दिली.
नुकतंच सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार आणि आता ही गोड बातमी त्यामुळे तिच्या चाहत्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.
माझं बाळ माझ्यासाठी लकी चार्म आहे. कारण माझं बाळ पोटात असताना मला माझ्या आयुष्यातील इतका मोठा प्रतिष्ठीत राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच गेल्या सहा महिन्यात मी गरोदरपणात अनेक वेगवेगळे म्युझीक अल्बम, नविन गाणी, काही प्रोजेक्टस शूट केलेत. त्यातील बरीचशी गाणी रिलीज झाली. काही गाणी लवकरच रिलीज होतील. मला खूप अभिमान आहे की माझ्या होणा-या बाळाने मला त्या परिस्थितीत अजिबात त्रास दिलेला नाही. आता मी माझ्या बाळाच्या स्वागतासाठी फारचं उत्सुक आहे. अशी भावना तिनं व्यक्त केल्या आहेत.