मुंबई – चित्रपट सृष्टीत अनेकांना कोणत्या कारणामुळे स्थान मिळालं हे सर्वश्रुत असतं. तसेच अनेकांना एकादा अभिनेता आणि अभिनेत्रीचं करिअर (career) कसं घडलं किंवा तिचं वैयक्तिक आयुष्य (personal life) कसं होतं हे जाणुन घ्यायचं असतं. आज आपण जयश्री गडकर (jayashree gadkar) यांच्या अनेक गोष्टी आज आपण इथं पाहणार आहोत. त्यांनी त्यांच्या खूप लहान वयात आपल्या करिअरला सुरूवात केली. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये मराठी, हिंदी, दूरचित्रवाणी मालिका यामध्ये उत्तम काम केलं म्हणून आजही त्याचे चित्रपट पाहताना त्यांनी अभिनय चांगला असल्याचे अनेकजण सांगतात. किंवा एखाद्या चित्रपटात त्यांनी केलेल्या भूमिकेचं उदाहरण देतात. त्यांचा जन्म स्वातंत्र्यपुर्व काळात झाला, तो कर्नाटकात, तो भाग आता उत्तर कन्नड म्हणून ओळखला जातो. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 21 फेब्रुवारी 1942 मध्ये झाला. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी त्यांच्या अभिनय करिअरला सुरूवात झाली आहे. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये मिळालेल्या भूमिकांना चांगला न्याय देण्याचा प्रयत्न केला.
बोलक्या डोळ्यांनी केलं प्रेक्षकांवरती राज्य
जयश्री गडकर यांनी महिला वर्गावर अधिक राज्य केलं कारण त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिका त्या काळातल्या महिलांना आपल्या वाटत होत्या. स्वातंत्र्यपुर्व आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात किंवा महाराष्ट्रात लगेच अर्थिकदृष्ट्या प्रगती झाली नाही. त्यावेळी घरातील परिस्थिती किंवा आलेल्या संकटांना कसं सामोरं जायला हवं अशा कणकर भूमिका देखील त्यांनी केल्या. त्यामुळं आजही त्याचे जुने चित्रपट पाहताना लोकांचा उर भरून येतो. रामायण मालिकेत त्यांनी कौशल्य मातेची भूमिका केल्यानंतर त्यांची लोकप्रियता अधिक झपाट्याने वाढली असल्याचे पाहायला मिळते. कारण त्यातली भूमिका त्यावेळी पुरूषांना आणि महिलांना सुध्दा अधिक आवडली होती.
फोटोमुळं मिळालं पहिलं काम
त्याचबरोबर त्यांनी कथक नृत्याचे धडे घ्यायला देखील सुरूवात केली. त्यावेळी त्यांचं नृत्य आणि गायन पाहून त्यांना अनेक चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम देखील मिळालं होतं. त्यांना मिळालेल्या पहिल्या चित्रपटाचे नाव होते, तमाशा त्यावेळी राम देवताळेकर्नाटकात एका कोकणी घरात जन्म घेतलेल्या गडकर यांचं वय पाच वर्षे असताना घरच्यांनी त्यांना घेऊन मुंबई गाठली. त्यावेळी त्यांना गायण करण्याचं प्रचंड वेड होतं त्यामुळे त्यांनी गायनाचे क्लास सुरू केला होता. यांनी त्यांचा एक फोटो काढला आणि तो तिथल्या स्टुडिओत लावला त्यावेळी तिथं आलेल्या दिनकर पाटील यांनी पाहिला आणि त्यांना दिसतं तसं नसतं या चित्रपटात नृत्य करण्याची पहिली संधी दिली. त्यांचं काम आवडल्यानंतर त्यांना अशी अनेक काम मिळत गेली.