मुंबई | 23 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) सध्या बऱ्याच चर्चेत आहेl. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे खूप कोतुक झाले. या चित्रपटात त्या आलिया भट्टच्या आजीची भूमिकेत दिसल्या होत्या. हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर धमाल करत आहे. याचदरम्यान शबाना आझमी यांनी सोशल मीडियावरून एक मोठा खुलासा केला आहे.
एक व्यक्ती, त्यांच्या नावे फसवणूक करण्याच प्रयत्न करत असल्याचे शबाना यांनी सांगितले. माझ्या नावाचा गैरवापर करून फिशिंग करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे, असे त्यांनी नमूद केले. ट्विटरवरून त्यांनी या सर्व प्रकाराची माहिती देत सर्वांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. अशा पद्धतीने लुटण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यामुळे (शबाना आझमी) यांच्या नावाने येणाऱ्या कॉल्स आणि मेसेजवर कोणीही विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.
काय केले ट्विट ?
मंगळवारी शबाना आझमी यांनी ट्विटरवरून याबद्दल पोस्ट केले आहे. ‘ माझ्या नावाने काही मेसेज माझ्या सहकाऱ्यांना आणि परिचितांना पाठवले जात असल्याचे आमच्या नुकतेच लक्षात आले आहे. हे स्पष्टपणे फिशिंग आहे. कृपया अशा मेसेज आणि कॉलवर क्लिक करू नका किंवा कोणतेही उत्तर देऊ नका. आम्ही पोलिसांत तक्रार करत आहोत. +66987577041 आणि +998917811675 या क्रमांकावरून असे संदेश पाठवले जात आहेत.’ असे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.
NOTICE
It has come to our notice that some of our colleagues and associates, have received messages purported to be from Ms Shabana Azmi. These are clearly “phishing” attempts asking responders to make purchases on App Store for the messenger. Please do not reply or pick any…
— Azmi Shabana (@AzmiShabana) August 22, 2023
दोन वर्षांपूर्वी आझमी यांचीच झाली होती फसवणूक
दोन वर्षांपूर्वी शबाना आझमी स्वतः ऑनलाइन फसवणुकीच्या बळी ठरल्या होत्या. खरंतर त्यांनी ऑनलाइन मद्याच्या होम डिलिव्हरीसाठी ॲडव्हान्स पेमेंट केले होते. मात्र बराच काळ उलटूनही त्यांना डिलीव्हरी मिळाली नव्हती, तेव्हा त्या ऑनलाइन पेमेंट स्कॅमला बळी पडल्याचे समोर आले.