Shabana Azmi on Farhan And Zoya : अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) दीर्घकाळापासून बॉलिवूड जगतात सक्रिय आहेत. त्या त्यांच्या चित्रपटांद्वारे चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. त्यांच्या खणखणीत अभिनयाने त्यांनी चित्रपट विश्वात एक विशेष स्थान मिळवले आहे. शबाना या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही खूप आनंदी आहेत आणि पती जावेद अख्तरसोबत (Javed Akhtar) खास बॉन्ड शेअर करतात. जावेद अख्तर यांची मुलं फरहान आणि झोयासोबत त्यांचं नातं, बॉन्डिंग कसं आहे , याबाबत त्यांनी नुकताच खुलासा केला आहे .
जावेद अख्तर यांनी पहिले लग्न अभिनेत्री हनी इराणीसोबत केले होते. त्यांना फरहान अख्तर आणि झोया अख्तर अशी दोन मुले आहेत. फरहान आणि झोया हे दोघेही आज इंडस्ट्रीतील मोठी नावं आहेत आणि त्यांच्या पायावर उभी आहेत. शबाना आझमी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, सावत्र आई असूनही फरहान आणि झोयासोबत त्यांचं बॉन्डिंग खूप खास आहे.
फरहानसोबतच्या बाँडिंगवर शबानाने काय म्हणाल्या ?
शबाना म्हणाल्या की, आमचे खूप मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मैत्री आणि विश्वासाच्या बळावर आमचे नाते खास आहे. मी देखील त्यांचा खूप आदर करतो आणि मला वाटते की ते दोघेही माझा खूप आदर करतात. याचे अधिक श्रेय मला त्याची आई हनी इराणी यांना द्यायचे आहे. हा हनी यांच्या उदारतेचा परिणाम आहे की त्यांची मुलं माझ्याशी प्रेमाने वागतात. जर हनी दयाळू नसती तर कदाचित तिची मुलं माझ्याशी कधीच बोलली नसती.
हनी यांच्यासोबतही आहे खास नातं
शबाना पुढे म्हणाल्या की, त्या हनी यांची आभारी आहे. त्यांच्यामुळेच शबाना या फरहान आणि झोयाच्याच नाही तर स्वतः हनीच्याही जवळ येऊ शकल्या. आमचे बाँडिंगही खूप खास आहे. आमच्या दोघांची खास गोष्ट म्हणजे आम्ही कधीच एकमेकांच्या कामात ढवळाढवळ करत नाही. जर एखाद्या विषयाव हनी यांना बोलायची इच्छा नसेल तर मी देखील त्याबद्दल बोलत नाही.