Mahira Khan | शाहरूखची हिरॉईन ‘या’ गंभीर आजाराशी देते आहे लढा, त्या चित्रपटानंतर बिघडली तब्येत…

| Updated on: Aug 29, 2023 | 6:08 PM

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने एक मोठा खुलासा केला आहे. 'रईस' चित्रपटानंतर ती गंभीर आजाराशी लढा देत असल्याचे तिने सांगितले आहे. तिच्या लग्नाच्या वृत्तामुळेही ती नुकतीच चर्चेत आली होती.

Mahira Khan | शाहरूखची हिरॉईन या गंभीर आजाराशी देते आहे लढा,  त्या चित्रपटानंतर बिघडली तब्येत...
Image Credit source: Instagram
Follow us on

Mahira Khan : पाकिस्तानमधील प्रसिद्ध अभिनेत्री माहिरा खान (Mahira Khan) हिने बॉलिवूडचा किंग खान शाहरूख (shah rukh khan) याच्यासोबत ‘रईस’ मध्ये काम करत हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटातील दोघांची जोडी चाहत्यांना खूपच आवडली होती. माहिराच्या कामाचेही खूप कौतुक करण्यात आले होते. मात्र याच चित्रपटानंतर तिला असा गंभीर आजा झाला, ज्यामुळ तिला पॅनिक ॲटॅक येऊ लागले होते. यासंदर्भातील महत्वाचा खुलासा माहिराने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.

रईस चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले होते. मात्र तो प्रदर्शित व्हायच्या आधीच ऊरी ॲटॅक झाला आणि पाकिस्तानी अभिनेत्यांवर भारतात काम करण्यास बंदी घालण्यात आली. तेव्हा तिला बायपोलर डिसऑर्डर डायग्रोसिकचा त्रास झाला होता. तिला पॅनिक ॲटॅकही आले होते.

नेमकं काय झालं ?

एका पॉडकास्ट मध्ये बोलताना माहिराने हा खुलासा केला. तेव्हा तिने सांगितलं की ती एका गंभीर आजाराशी लढा देत आहे आणि गेल्या ६-७ वर्षांपासून डिप्रेशन व ॲंग्झायटीसाठी औषधं घेत आहे. हे ॲटॅक येण्यास अचानक सुरूवात झाली. मी (रईस) चित्रपटाचे शूटिंग केलं होतं, मी बॉलिवूडमध्ये काम करत होते. सगळं काही नीट सुरू होतं. मात्र तेवढ्यात ॲटॅक झाला. त्या हल्ल्यानंतर राजनैतिक स्तरावर सर्व गोष्टी बदलल्या. पाकिस्तानी कलाकारांना भारतात बंदी घालण्यात आली. आणि माझ्यासाठी ते सगळंच डिप्रेसिंग झालं. कारण त्यावेळी लोकं सतत माझ्याविरोधात ट्विट करत होते. मला फोनवर धमक्या मिळत होत्या, असं तिने सांगितलं.

‘रईस’ नंतर आले पॅनिक ॲटॅक

ती पुढे म्हणाली, मी माझ्या चित्रपटाचं प्रमोशनही करू शकले नाही. पण तरीही रईस माझ्या देशात प्रदर्शित व्हावा, अशी माझी इच्छा होती. कारण मला माहीत होतं लोकांना माझी आणि शाहरूखची जोडी खूप आवडेल. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पहायला लोकं येतील, हे मला माहीत होतं. पण तसं नाही झालं. ते सगळंच माझ्यासाठी खूप डिप्रेसिंग होतं.  तो काळ माझ्यासाठी खूपच कठीण होता. मी रात्रभर झोपू शकायचे नाही, मला पॅनिक ॲटॅक येऊ लागले होते, असे माहिराने नमूद केलं.