प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान ही बऱ्याचदा चर्चेत असते, तिचे जगभरात लाखो चाहते आहेत. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्य, दोघांचाही ताळमेळ साधत ती जगत असते. तिच्या सोशल मीडियावर लाखो चाहते कमेंट करत असतात. नुकतीच तिने एक पोस्ट शेअर करत तिच्या पतीला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. पण त्यावर सध्या युजर्सच्या कमेंट्सचीच जास्त चर्चा होत आहे.
रोमँटिक पोस्टद्वारे माहिराने दिल्या शुभेच्छा
माहिरा खान हिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये ती टेरेसवर आपल्या पतीला मिठी मारताना दिसत आहे. दोघांची रोमँटिक केमिस्ट्री खूप पसंत केली जात आहे. या फोटोत दोघांचे चेहरे मात्र दिसत नाहीयेत. हॅपी बर्थडे माय लव्ह. आमच्यासाठी प्रार्थना करा. ते खूप चांगले ठरेल, असे फोटोच्या कॅप्शनमध्ये माहिराने लिहिले.
यूजर्सच्या कमेंट्सचीच चर्चा
मात्र तिचा हाँ फोटो काही यूजर्सना रुचलेला दिसत नाहीये. काहींनी तर तिला या फोटोवरून ट्रोल करण्याचा प्रयत्न केलाय. एकाने लिहीलं – कोण आहे तो, त्याचं नाव तरी काय ? तर दुसऱ्या युजरने माहिराला सुनावलयं- सर्वात पहिले ही प्रार्थना की, देव तुम्हाला प्रायव्हसी (जपण्याची) अक्कल देवो.. ! मात्र, इतर चाहत्यांना त्यांचं बॉन्डिंग आवडलं आहे. लोकांनी त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थनाही केली. एका यूजरने लिहिले- माहिरासारखा लाइफ पार्टनर मिळाल्याने तो खूप भाग्यवान आहे. ही त्याच्यासाठी मोठी भेट आहे.
माहिराचं लग्न
माहिराने गेल्या वर्षी सलीम करीमशी लग्न केले होते. त्यांच्या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. लग्नाचे फोटो आणि व्हिडिओही खूप व्हायरल झाले. ब्रायडल लूकमध्ये माहिरा खूपच सुंदर दिसत होती. सलीमसोबत माहिराचे हे दुसरे लग्न आहे. संपूर्ण लग्नात माहिराचा मुलगा अझलानही तिच्यासोबत होता. माहिराचे पहिले लग्न अली अस्करीसोबत झाले होते. दोघांनी 2007 मध्ये लग्न केले पण 2015 साली ते वेगळे झाले. या लग्नापासून त्यांना अजलन हा मुलगा आहे.
या शो मुळे मिळाली ओळख
माहिरा खान हमसफर या शोसाठी ओळखली जाते. या शोमध्ये तिने प्रसिद्ध अभिनेता फवाद खानसोबत काम केलं. एवढंच नव्हे तर माहिराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. ती शाहरुख खानच्या रईस या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र, हा चित्रपट फारसा चालला नाही.