मुंबईः शाहरुख खानच्या पठाण सिनेमातलं गाणं सध्या वादाचा विषय बनले आहे. या गाण्यातील दृश्यं, गाण्याचे दोन शब्द आणि दिपीका पदुकोननं परिधान केलेली केशरी रंगाच्या बिकीनीवरुन वाद आणखी पेटला आहे. या गाण्यावर थेट हिंदू महासभेनं आक्षेप घेतला आहे. हिंदू महासभेच्या स्वामी चक्रपाणी महाराजांच्या मते ‘पठाण’ चित्रपटात भगव्या रंगाचा अपमान केला गेला आहे.
सोशल मीडियामध्ये काही नेटकरी आमीर खानच्या लालसिंग चड्डाप्रमाणेच शाहरुख खानचा पठाण सिनेमाविरोधातही बॉयकॉट मोहिम चालवण्याचा इशारा देण्यात आला आहे.
गाण्यात दिपीका पदुकोनने केशरी रंगाचीच बिकीनी का घातली आहे असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. आणि गाण्याचे शब्द बेशरम रंग असे का ठेवले गेले. असा प्रश् विचारून जोरदार टीका केली जात आहे.
या गाण्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्या आहेत. त्यामुळे हे गाणं सेन्सॉर बोर्डानं हे गाण्यास स्वीकारु नये., असंही काही यूजर्सनी मत व्यक्त केले आहे.
तर कुस्तीत अनेक पैलवान केशरी रंगाचंच लंगोट परिधान करतात. तेव्हा भावना दुखावत नाहीत का? असा सवालही उपस्थित केला गेला आहे.
दरम्यान, मध्यप्रदेशातल्या भाजप सरकारनंही या वादात उडी घेतली आहे. जर आक्षेपार्ह दृश्यं मागे घेतली नाहीत., तर मध्य प्रदेशात सिनेमा प्रदर्शित न होऊ देण्याचा इशारा मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिला आहे.
26 जानेवारीला शाहरुख खानचा पठाण सिनेमा प्रदर्शित होतो आहे. जवळपास 4 वर्षानंतर शाहरुख खानचा हा बिगबजेट मोठा सिनेमा आहे. मात्र ज्याप्रकारे लालसिंग चड्डा सिनेमाला बॉयकॉट मोहिमेचा फटका बसला., तोच प्रकार पठाण सिनेमाबाबत घडतो का., हे आता येणारा काळच ठरवणार आहे.