शाहरूखने बंगल्याचे नाव सुरुवातीला ‘मन्नत’ नाही,’हे’ ठेवले होते….; तर या राजाने राणीसाठी बांधलेला हा महल

| Updated on: Mar 19, 2025 | 5:48 PM

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की शाहरुख खानचा आलिशान बंगला 'मन्नत' पूर्वी अनेक लोकांची मालमत्ता होता. तसेच शाहरूने त्याच्या बंगल्याचे नाव आधी 'मन्नत' नाही तर वेगळेच काही ठेवले होते. चला जाणून घेऊयात शाहरूखच्या 'मन्नत'बद्दल काही रंजक गोष्टी

शाहरूखने बंगल्याचे नाव सुरुवातीला मन्नत नाही,हे ठेवले होते....; तर या राजाने राणीसाठी बांधलेला हा महल
Shah Rukh Khans Mannat; History, Owners
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

शाहरुख त्याच्या स्वप्नातील ‘मन्नत’ या घरात आणखी दोन मजले बांधण्याची योजना आखत आहे. हे घर समुद्रकिनारी आहे. मन्नत ही एक ऐतिहासिक वास्तू म्हणूनच तिच्याकडे पाहिलं जातं. शाहरूखने अतिशय मेहनतीने हा बंगला खरेदी केला होता. शाहरुखने 2001 मध्ये ते सुमारे 13 कोटी रुपयांना खरेदी केला होता. पण तुम्हाला माहित आहे का की मन्नतचे पूर्वीचे नाव हे ‘विला व्हिएन्ना’ होते. तसेच शाहरुखच्या आधी हा बंगला अनेक लोकांच्या मालकीचा होता.

‘व्हिला व्हिएन्ना’चा इतिहास

मुंबईचे इतिहास प्रेमी देवाशिष चक्रवर्ती यांनी या बंगल्याबद्दल एक लेख लिहिला होता ज्यामध्ये त्यांनी या बंगल्याच्या मालकांबद्दल लिहिले होते. 1800 च्या उत्तरार्धात मंडीचे राजा विजय सेन यांनी त्यांच्या एका राणीसाठी हा बंगला बांधला होता असं म्हटलं जातं. राजाच्या मृत्यूनंतर, 1915 मध्ये पेरिन मानेकजी बाटलीवाला यांनी हा बंगला विकत घेतला आणि व्हिएन्नाच्या संगीतावरील प्रेमामुळे त्याचे नाव ‘व्हिला व्हिएन्ना’ ठेवलं.

शाहरूखच्या आधी होते हे मालक 

पेरिनने नंतर ते त्याची बहीण खुर्शीदबाई संजना आणि तिच्या पतीला हा बंगल्याचा ताबा दिला. या जोडप्याला मूलबाळ नसल्यानं त्याने ते त्याची बहीण गुलबानू हिला हा बंगला दिला. जिने पुढे ते तिचा मुलगा नरिमन दुबाश याला दिला. नरिमन यांनी हा बंगला एका बिल्डरला विकला ज्याच्याकडून प्रसिद्ध चित्रपट निर्माते भरत शाह यांनी तो विकत घेतला. आणि मग त्यांच्याकडून शाहरूखने तो बंगला विकत घेतला.

शाहरूखने सुरुवातीला बंगल्याचे नाव मन्नत नाही तर ‘हे’ ठेवले होते

सुरुवातीला शाहरुखला मुंबईत फक्त एक फ्लॅट खरेदी करायचा होता पण जेव्हा त्याने ‘व्हिला व्हिएन्ना’ पाहिला तेव्हा तो हा बंगला खरेदी करण्यासाठी उत्सुक झाला. त्यावेळी त्याच्याकडे इतके पैसेही नव्हते, पण कठोर परिश्रमानंतर त्याने तो बंगला अखेर विकत घेतलाच. जेव्हा त्याने हा बंगला खरेदी केला तेव्हा तो खूप जुना आणि जीर्ण अवस्थेत होता. त्याने त्याचे नूतनीकरण करून त्याला नवीन रूप दिले. त्याचे इंटीरियर काम गौरी खानने केले होते. सुरुवातीला त्यांनी त्याचे नाव ‘जन्नत’ ठेवले, परंतु जेव्हा त्याला त्यांच्या कारकिर्दीत यश मिळाले तेव्हा पुन्हा त्याने त्याचे नाव बदलून ‘मन्नत’ ठेवले.

आजचा ‘मन्नत’ कसा आहे?

आज, मन्नत हा केवळ एक बंगला नाही तर एक ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित वास्तू बनलं आहे. त्याची सध्याची किंमत 250 कोटी रुपयांपेक्षाही जास्त असल्याचं सांगितलं जातं आहे. शाहरुख खानचे ‘मन्नत’ हे केवळ त्याचे घर नाही तर त्याच्या संघर्षाचे आणि यशाचे प्रतीक आहे.