ड्रग्ज प्रकरणात NCB कडून क्लिन चीट मिळान्यानंतर शाहरुखचा मुलगा आर्यन खानची दारु पार्टी? दारु पितानाचा व्हिडिओ व्हायरल

| Updated on: Jul 19, 2022 | 5:15 PM

एका नाईटक्लबमध्ये आर्यन खान पार्टी करताना दिसत आहे. लाऊड मुझ्यीकची मजा घेत आर्यन ड्रिंक करताना दिसत आहे. आर्यनने मास्क लावला आहे. हातात दारूचा ग्लास घेतल्यानंतर तो मास्क खाली करतो आणि पुन्हा चेहऱ्याला मास्क लावत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

ड्रग्ज प्रकरणात NCB कडून क्लिन चीट मिळान्यानंतर शाहरुखचा मुलगा आर्यन खानची दारु पार्टी? दारु पितानाचा व्हिडिओ व्हायरल
Follow us on

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानचं (Aryan Khan) क्रूडवरील ड्रग्स प्रकरणामुळे चांगलाच चर्चेत होता. आर्यनला जवळपास एक महिना तुरुंगात काढावा लागला होता. तुरुंगातून बाहेर आल्यावर आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे. यानंतर बऱ्याच दिवसांनी आर्यन खान पार्टी मूडमध्ये दिसला आहे. आर्यन खानचा एक पार्टीदरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Aryan Khan Viral Video) होत आहे. या व्हिडिओत आर्यन दारु पिताना दिसत आहे.

नाईटक्लबमध्ये आर्यन खानची पार्टी

एका नाईटक्लबमध्ये आर्यन खान पार्टी करताना दिसत आहे. लाऊड मुझ्यीकची मजा घेत आर्यन ड्रिंक करताना दिसत आहे. आर्यनने मास्क लावला आहे. हातात दारूचा ग्लास घेतल्यानंतर तो मास्क खाली करतो आणि पुन्हा चेहऱ्याला मास्क लावत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

व्हिडिओमध्यये दिसणारा तरुण आर्यन खानच असल्याचा दावा

व्हिडिओ मध्ये काळ्या रंगाचं टी-शर्ट घातलेला हा मुलगा खरंच आर्यन खान आहे का? तसेच त्याच्या हातात दारुचे ग्लास आहे का? हे अद्यापही पूर्ण स्पष्ट झालेलं नाही. पण या व्हिडिओमुळे आर्यन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आजू बाजूचे लोक त्याला आर्यन आर्यन म्हणून चिअर अप करताना दिसत आहेत. यामुळे हा तरुण आर्यन खानच असल्याचा दावा केला जात आहे.

क्रूझ ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला क्लीन चिट

कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी 27 मे रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अभिनेता शाहरुख खानचा आर्यन खान आणि इतर पाच जणांना दोषमुक्त केलं. गेल्या वर्षी 2 ऑक्टोबर रोजी मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझवर एनसीबीने छापा टाकला होता. याप्रकरणी आता 14 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नसल्याचं आरोपपत्रात नमूद करण्यात आलं. एनसीबीने क्रूझवर छापा टाकल्यानंतर आर्यनसह इतर सहा जणांना अटक केली होती. आर्यनने जवळपास एक महिना तुरुंगात घालवला होता. एनसीबीकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू होती. आर्यनला या प्रकरणात गोवण्यात आलं असावं आणि पैसे उकळण्याचा प्रयत्न केला गेला असावा, असा आरोपही झाले. त्यानंतर या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) वर्ग करण्यात आला होता.