लांब काळं जॅकेट घालून लोकांपासून लपत-छपत बोटीत बसताना शाहरुखचं डोकंच आदळलं; व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Dec 31, 2024 | 2:53 PM

लोकांनी किंवा पापाराझींनी पाहू नये म्हणून शाहरूख लांब काळा कोट घालत लपत-छपत तो बोटीत बसत होता पण तेवढ्यात त्याच्यासोबत जे घडलं ते पाहून शाहरूखच्या चाहत्यांना नक्कीच वाईट वाटलं असणार.

लांब काळं जॅकेट घालून लोकांपासून लपत-छपत बोटीत बसताना शाहरुखचं डोकंच आदळलं; व्हिडीओ व्हायरल
Follow us on

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान हा कोणत्याना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतो. पण यावेळी त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे ते त्याच्या एका वेगळ्याच प्रसंगामुळे लोकांनी किंवा पापाराझींनी पाहू नये म्हणून तो लपत-छपत जात होता पण तेवढ्यात जे घडलं ते पाहून शाहरूखच्या चाहत्यांना नक्कीच वाईट वाटलं असणार.

अलिबाग येथील फार्म हाऊसवर सुट्टी घालवून शाहरूख मुंबईत परतला

अलिबाग येथील फार्म हाऊसवर कुटुंबासोबत सुट्टी घालवून शाहरूख मुंबईत परतला आहे. अभिनेता मुंबईत गौरी खान, मुलगी सुहाना, अबरामसोबत दिसला. दरम्यान यावेळचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये शाहरूख सोबत एक किस्सा घडला. बोटीत बसत असताना त्याचं डोकं जोरात बोटीच्या दाराला आदळलं. हा प्रसंग व्हिडीओमध्येही स्पष्ट दिसत आहे. हे पाहून त्याच्या चाहत्यांना नक्कीच वाईट वाटलं. तशा अनेकांना कमेंटसही केल्या आहेत.

बोटीत बसताना शाहरूखसोबत घडली घटना

शाहरुख खान दरवर्षी आपल्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून कुटुंबासोबत ती सुट्टी घालवतो. ख्रिसमसच्या सेलिब्रेशनसाठी शाहरुख कुटुंब आणि त्याच्या मित्रांना घेऊन अलिबाग येथील फार्म हाऊसवर गेला होता. मात्र, यावेळी त्यांच्यासोबत आर्यन खान दिसला नाही.शाहरुख खानसोबत त्याची मुलगी सुहाना आणि तिचा कथित बॉयफ्रेंड अगस्त्य नंदा देखील स्पॉट झाले होते. मात्र, सुहाना दुसऱ्या कारमध्ये बसून घराकडे निघाली. शाहरुखच्या चाहत्यांनी ‘X’ वर काही व्हिडिओ शेअर केले आहेत.


बोटीत जात असताना शाहरुखसोबत बोटीत एक घटना घडली आहे. पापाराझी आणि चाहत्यांना टाळण्यासाठी, त्याने टोपी असलेले लांब काळे कोट घातले होते. जेव्हा तो बोटीत बसण्यासाठी जात होता तेव्हा शाहरुखचं डोकं बोटीच्या दाराला जोरात आदळलं. मात्र याकडे लक्ष न देता शाहरुख बोटीत शिरला.

शाहरुखच्या कुटुंबातील नवीन सदस्यही दिसला

दरम्यान या व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे शाहरुखच्या कुटुंबातील एक नवीन सदस्य देखील दिसला. तो म्हणजे कुत्र्याचं छोटं पिल्लू. जे किंग खानने हातात धरलं होतं. शाहरुख आपल्या लाडक्या पिल्लाला हातात धरून बोटीत बसण्यासाठी गेला. पापाराझी आणि चाहत्यांना टाळण्यासाठी, त्याने लांब काळे कोट घातले होते.

शाहरूखच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर “पठाण” आणि “जवान”च्या यशानंतर शाहरुख खान मुलगी सुहानासोबत सुजॉय घोषच्या “किंग” या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेता ग्रे शेडमध्ये दिसणार आहे. दुसरीकडे आर्यन खानही दिग्दर्शनात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. आर्यनने “स्टारडम” नावाचा एक चित्रपट दिग्दर्शित केला आहे ज्याचा प्रीमियर थिएटरवर नाही तर नेटफ्लिक्सवर होणार असल्याचं म्हटलं जातं