मुंबई – बॉलिबूडचा बादशाह सुपरस्टार शाहरूख खानचा (shahrukh khan) जोश (josh) चित्रपटातून विलनचा रोल करणा-या शरद कपूरचा (sharad kapoor) आज 54 वा वाढदिवस आहे. शरद कपूरची कारर्कीदीमध्ये त्याने विलनची (vilan)अधिक काम केली आहेत. तसेच त्याची काम लोकांना अधिक आवडली देखील आहेत. त्यामुळे एखाद्या चित्रपटात विलनचा रोल मिळाला की तो चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता असायची कारण एखाद्या भूमिकेत घुसून चांगलं काम कसं करावं हे शरद कपूर कडून शिकावं. जोश चित्रपटामुळे शरद कपूरला एक वेगळी ओळख मिळाली, त्यामुळे त्याने आपलं करिअर विलन म्हणून घडवलं किंवा त्याला तसेच रोल मिळाले असं म्हणायला हरकत नाही. शरदचा जन्म कोलकाता मधील पश्चिम बंगालमध्ये 1976 साली झाला आहे. शरदला लहान असल्यापासून अभिनय क्षेत्रात करिअर करायचं असल्याने त्याने सुरूवातीपासूनचं त्याच्या करिअरकडे फोकस ठेवला होता. त्यामुळे त्याला अभिनय क्षेत्रात नाव कमावला आलं.
जोश चित्रपटात उत्तम अभिनयनंतर पुरस्कार
शरद कपूरने त्याच्या सुरूवातीच्या काळात तबदीली चित्रपटात भूमिका मिळवली. त्या चित्रपटात त्याला जॉकी श्रॉफसोबत काम करण्याची संधी मिळाली. शरदने आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये सह कलाकाराची भूमिका केली आहे. जोश चित्रपटात उत्तम अभिनय केल्यानंतर शरदला पुरस्कार देखील मिळाला होता. त्यामुळे तिथून त्याच्या करिअरला एक वेगळं वळण मिळालं असं म्हणायला हरकत नाही. तिथं त्याला अधिक यश मिळूनही बॉलिवूडमध्ये अधिक काम मिळालं नाही. त्यानंतर शरदला सलमान खानने जय हो चित्रपटात काम दिले होते. तिथंही त्याला सहकलाकाराची भूमिका वाट्याला आली होती.
शरदच्या वाटयाला आलेले चित्रपट
शरद कपूर सध्या त्याच्या इंडस्ट्रीपासून लांब झाला असून त्याने त्याने व्यवसायात लक्ष घातल आहे. शरदने त्याची हॉटेल सुरू केले आहेत. तो सध्या त्या कामात व्यस्त असल्याची माहिती मिळत आहे. त्याने सुरू केलेली हॉटेल बेंगलोर आणि मुंबईत आहेत. शरदचं लग्न ज्योती बासूच्या नातेवाईक कोयल बासूसोबत केले आहे. त्याचबरोबर त्याने आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये सहकालाकाराचे काम केले आहे. इंडस्ट्रीमध्ये अधिक मिळत नसल्याने तो व्यवसायकडे वळला असल्याचे अनेकजण म्हणतात. ‘क्योंकि मैं झूठ नहीं बोलता’, ‘ये है जलवा’, ‘कुछ तुम कहो कुछ हम कहें’, ‘जानी दुश्मन’, ‘हथियार’ ‘एलओसी कारगिल’ और ‘जोश’ इत्यादी चित्रपटात त्याने काम केलं आहे.