मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली नसून, हे आत्महत्येचेच प्रकरण असल्याचे एम्सच्या (AIIMS Report) विशेष पथकाने म्हटले आहे. एम्सने आपला अहवाल सीबीआयकडे सुपूर्द केला आहे. या अहवालानंतर अनेकांच्या नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेता शेखर सुमननेदेखील (Shekhar Suman) एम्सच्या रिपोर्टवर आपला राग व्यक्त केला आहे. सुशांत प्रकरणाचीही गळा दाबून हत्या करण्यात आली, असे ट्विट त्याने केले आहे. (Shekhar Suman reacted on Sushant Singh Rajput AIIMS Report)
Sushant’s case has been strangulated to death.Asphyxia?or Aise fix kiya?
— Shekhar Suman (@shekharsuman7) October 10, 2020
या प्रकरणात आलेल्या नाट्यमय वळणामुळे अभिनेता शेखर सुमन संतापला आहे. सुशांत प्रकरण वेगळ्याच वळणावर जात असून, त्यात त्याला न्याय मिळत नसल्याचे म्हणत त्यांनी आपले दुःख व्यक्त केला आहे. या आधीही त्यांनी सुशांत प्रकरण हत्याच असल्याचा दावा केला होता. आता पुन्हा एक ट्विट करत त्यांनी आपला संताप व्यक्त केले आहे.
‘सुशांत प्रकरणाचीही गळा दाबून हत्या’, असे ट्विट त्यांनी केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून शेखर सुमन (Shekhar Suman) यांनी थेट तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. सर्वकाही आधीच निश्चित झाले होते, असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा आपला राग व्यक्त केला आहे. (Shekhar Suman reacted on Sushant Singh Rajput AIIMS Report)
Rhea gets bail out of https://t.co/44sNbQDuH8 contradiction in CBI and AIIMS report.Miranda n Dipesh granted https://t.co/fdP1nA0bGn second forensic team to be formed.THE END.
घर चलें?— Shekhar Suman (@shekharsuman7) October 7, 2020
सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज कनेक्शनमध्ये नाव समोर आल्याने अभिनेत्री रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक करण्यात आली होती. तब्बल एक महिना रिया भायखळा तुरुंगात बंदिस्त होती. तीन वेळा तिचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. मात्र, चौथ्यावेळी तिचा जामीन अर्ज मंजूर झाला. रिया चक्रवर्ती तुरुंगातून बाहेर आल्याने शेखर सुमन पुन्हा एकदा संतापला आहे. रियाच्या जामीन अर्जावर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) हत्या झाली नसून, हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचा दावा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सच्या (AIIMS) विशेष पथकाने केला आहे. त्याचप्रमाणे या विशेष पथकाने आपला संपूर्ण अहवाल सीबीआयकडे सुपूर्द केला आहे. याआधीही एम्सच्या (AIIMS) विशेष पथकाने सुशांतवर विषप्रयोग केला गेल्याचा दावा फेटाळून लावला होता. त्यामुळे या अहवालानंतर, सुशांतप्रकरणात हत्येचा दावा करणारे तोंडघशी पडले आहेत.
(Shekhar Suman reacted on Sushant Singh Rajput AIIMS Report)
संबंधित बातम्या :
Sushant Singh Rajput Case | नव्या फॉरेन्सिक पथकाची नियुक्ती करा, सुशांतच्या वकिलांची मागणी
सुशांतची हत्या नव्हे आत्महत्याच!, एम्सच्या विशेष पथकाचा दावा
‘एम्स’च्या रिपोर्टने महाराष्ट्राच्या बदनामीचा कट उधळला, शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
सुशांतचा सीबीआय अहवाल लवकरात लवकर यावा; जनतेला सत्य समजलंच पाहिजे : अनिल देशमुख