मुंबई : अभिनेत्री शर्लिन चोप्राचे (Sherlyn Chopra) नाव अनेकदा कोणत्या ना कोणत्या वादात अडकले आहे. शर्लिन चोप्रा अनेकदा तिच्या बिनधास्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. अनेकवेळस ती तिचे मुद्दे सर्वांसमोर उघडपणे मांडते. यावेळी ती चर्चेत आली आहे. सध्या शर्लिन चोप्राबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेत्रीचा विनयभंग (molestation) झाला आहे. त्यामुळे तिने पोलिसांत (police case) तक्रार नोंदवली आहे.
शर्लिन चोप्राने मुंबईतील जुहू पोलीस स्थानकात एका फायनॅन्सरविरोधात तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्रीने फायनॅन्सरवर विनयभंगाचा आरोप केला आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी पैसे देण्याच्या बहाण्याने आरोपीने शर्लिन चोप्राचा विनयभंग केला, असे तक्रारीत म्हटले आहे. या कृत्याला अभिनेत्रीने विरोध केला असता त्या फायनॅन्सरने मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच त्याने मला जीवे मारण्याची धमकीही दिली, असेही शर्लिन चोप्राने तक्रारीत नमूद केले आहे.
शर्लिन चोप्राच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जुहू पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम 354, 506,509 अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
दरम्यान शर्लिन चोप्रा दररोज नवनवीन खुलासे करून सर्वांना आश्चर्यचकित करते. याआधीही तिच्यात आणि राखी सावंतमध्ये बरेच वाद झाले होते. त्या दोघींनी मीडियासमोर एकमेकांवर जोरदार आरोप केले होते.
यापूर्वी शर्लिन चोप्राने चित्रपट निर्माता साजिद खानबद्दलही बरीच विधाने केली होती. जेव्हा तो बिग बॉसच्या घरात होता तेव्हा अभिनेत्रीने त्याला बाहेर काढण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. पण ती साजिदला शोमधून बाहेर काढू शकली नाही. या मुद्यावरून तिने सलमान खानलाही लक्ष्य केले होते. ‘सलमान खानसाठी त्याची मैत्री महत्वाची आहे की महिलासांठी ठोस भूमिका घेणं महत्वाचं आहे ? जर आम्ही त्याच्या बहिणी असतो, तर तो असं वागला असता का ? सलमान आणि बाकीचे सगळे शांत का आहेत ? साजिद खानला सेलिब्रिटी म्हणून दाखवण्यात येत आहे, आणि सगळेच शांत आहेत..’ असे शर्लिनने म्हटले आहे.
शर्लिन चोप्राने राज कुंद्रा प्रकरणातही वक्तव्य केले होते. आता पुन्हा शर्लिन चोप्रा या नवीन प्रकरणामुळे चर्चेत आली आहे.