‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ म्हणजे सर्वांच्याच आवडीचा कार्यक्रम. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार प्रेक्षकांच्या अगदीच जवळचे आहेत. या लोकप्रिय कार्यक्रमाचं नवं पर्व सुरू झालं आहे. विदेशातील दौरे झाल्यानंतर 2 डिसेंबरपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कलाकारांचा कल्ला प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील कलाकारांनी आपल्या कामानं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. एवढचं नाही तर हास्यजत्रा कार्यक्रमामुळे बऱ्याच नवोदित कलाकारांना ओळख मिळाली असून ते रुपेरी पडद्यावर देखील पाहायला मिळत आहेत.
शिवाली आपल्याच मित्राच्या प्रेमात
हास्यजत्रेतील अनेक कलाकार हे चित्रपटांमध्येही झळत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे शिवाली परब. अभिनेत्री शिवाली परबसुद्धा प्रचंड अॅक्टीव असते.कल्याणची चुलबुली म्हणून ओळख असलेल्या शिवालीचा चाहता वर्गही प्रचंड प्रमाणात आहे. अनेक जण तिच्या अनियासोबतच तिच्या सौंदर्यांचेही कौतुक करत असतात. पण तुम्हाला माहितीये का की शिवाली कोणाची चाहती आहे ते.
शिवाली तिच्याच हास्यजत्रा ग्रुपमधील एका अभिनेत्याची चाहती आहे. एवढच नाही तर तो अभिनेता म्हणजे शिवालीचा क्रश आहे. नुकताच तिने तिच्या क्रशचा खुलासा केला. हा क्रश ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रा’मधील अभिनेता आहे. अलीकडेच शिवालीने हास्यजत्रेमधील कलाकारांबरोबर एका माध्यमाने घेतलेल्या मुलाखतीवेळी तिने सर्वांसमोर कबुल केलं आहे.
शिवालीकडून सत्य ऐकून अभिनेता म्हणाला “दुसरं लग्न कराव…”
मुलाखतीवेळी शिवालीला उपस्थितीत असलेल्या कलाकारांची कार्टुनबरोबर तुलना करायला सांगितलं. तेव्हा तिने क्रशचा खुलासा केला. शिवालीचा क्रश म्हणजे तिचाच मित्र सावत्या आहे. रोहित माने हा शिवालीचा क्रश असल्याचं तिने कबुल केलं.
शिवाली म्हणाली, “सावत्या म्हणजे माझ्यासाठी शिजुका आहे. कारण मी कॉलेजमध्ये असताना तो नाटक वगैरे करायचा. मी त्याला बघायला जायचे. तो माझा क्रश होता.”पुढे शिवाली म्हणाली की, रोहितचं एक नाटक मी आठ ते नऊ वेळा मुंबईत बघितलंय. इतकं मी त्याला बघायला जायची. नोबितासाठी शिजुका कशी आहे, तसं माझ्यासाठी सावत्या आहे” . शिवाली परबचं हेच बोलणं ऐकून एकच हशा पिकला. तेव्हा मजेत रोहित माने म्हणाला की, “मला दुसरं लग्न करावं लागतंय.”
दरम्यान, शिवाली परबचा कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच तिचं नवं नाटक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रसाद खांडेकर लिखित, दिग्दर्शित ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकाच्या माध्यमातून शिवाली नाट्य क्षेत्रातही आता पदार्पण करत आहे. या नाटकात शिवालीसह प्रसाद खांडेकर, ओंकार राऊत, भक्ती देसाई, प्रथमेश शिवलकर आणि नम्रता संभेराव पाहायला मिळणार आहे. 21 डिसेंबरपासून हे नाटक रंगभूमीवर येणार आहे. तसंच शिवालीचा ‘मंगला’ नावाचा चित्रपट 17 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.