Shoaib Malik | घटस्फोटानंतर सानिया मिर्झाला मिळणार इतकी पोटगी? आकडा ऐकून…

| Updated on: Jan 20, 2024 | 8:42 PM

क्रिकेट जगतासह भारत-पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये या सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या घटस्फोटाची चर्चा असलेली पाहायला मिळत आहे. तिसरं लग्न करत केल्याने दोघांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झालं आहे. मात्र आता शोएब मलिकला आता किती पोटगी द्यावी लागणार जाणून घ्या.

Shoaib Malik | घटस्फोटानंतर सानिया मिर्झाला मिळणार इतकी पोटगी? आकडा ऐकून...
Shoaib Malik Sana Javed
Follow us on

मुंबई : पाकिस्तान क्रिकेट संघाचा खेळाडू शोएब मलिक याच्या विवाहाची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. शोएब मलिक याने सना जावेद या पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत विवाह केला आहे. भारताचा जावई म्हणून कायम शोएबची चर्चा असायची. मात्र शोएब आणि सानियाचा घटस्फोट झाला आहे. क्रिकेट जगतासह भारत-पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये या घटस्फोटाची जोरदार चर्चा असलेली पाहायला मिळत आहे. शोएब मलिकला आता किती पोटगी द्यावी लागणार जाणून घ्या.

शोएब मलिकला द्यावी लागणार इतकी पोटगी?

2010 साली शोएब मलिक याने सानियासोबत लग्न केलं होतं. त्यावेळी शोएबची पहिली पत्नी आयशा सिद्दीकी हिने आरोप केला होता. शोएब मला घटस्फोट न देता सानियासोबत लग्न करत आहे. 2002 मध्ये शोएब आणि आयशाचं लग्न झालं होतं. आयशा सिद्दीकीने फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यासोबतच एक व्हिडीओ क्लिपही शेअर केली होती.

या संपूर्ण प्रकरणामध्ये शोएबने सुरुवातीला आयशासोबत लग्न करण्यास नकार दिला होता, पण सानियासोबतच्या लग्नाच्या काही दिवस आधी त्याने एप्रिल 2010 मध्ये पहिली पत्नी आयशा सिद्दीकी हिला घटस्फोट दिला होता. आता सानियासोबतही शोएबचा घटस्फोट झाला आहे. दोघेही मोठे जागतिक पातळीवर मोठे खेळाडू आहेत. सानिया मिर्झा ही मोठी टेनिस स्टार आहे तर शोएब मलिक क्रिकेटमधील मोठा स्टार खेळाडू आहे.

दरम्यान, शोएबची पहिली पत्नी आयशा सिद्दीकीने घटस्फोट घेताना 15 कोटी रुपयांची पोटगीही घेतल्याची माहिती समोर आली होती. आता सानिया आणि शोएबला सहा वर्षांचा मुलगाही आहे. त्यामुळे तिला किती कोटी रूपयांची पोटगी द्यावी लागते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र एवढं मात्र नक्की आहे की सानियाला आयशापेक्षा जास्त रूपये पोटगीमध्ये मिळू शकतात. त्यामुळे 2010 साली 15 कोटी तर मग आता किती मोजावे लागतील? रिपोर्टनुसार शोएब मलिकची एकूण संपत्ती 28 मिलियन डॉलर आहे. म्हणजेच तो 230 कोटींचा मालक आहे.