विवेक ओबेरॉयला चित्रपटात घेतलं म्हणून निर्माते नाराज, सोबत काम करण्यास दिला नकार, दिग्दर्शकाचा मोठा खुलासा

| Updated on: May 30, 2023 | 12:27 PM

Bollywood Director Statement : शूटआउट ॲट लोखंडवाला या प्रसिद्ध ॲक्शन फिल्मचा दिग्दर्शक अपूर्व लखिया याने चित्रपटाच्या रिलीजच्या 16 वर्षांनंतर एक मोठा खुलासा केला आहे.

विवेक ओबेरॉयला चित्रपटात घेतलं म्हणून निर्माते नाराज, सोबत काम करण्यास दिला नकार, दिग्दर्शकाचा मोठा खुलासा
Follow us on

Bollywood Director On Vivek Oberoi : 2007 साली आलेला शूटआउट ॲट लोखंडवाला (shootout at lokhandwala) हा चित्रपट आजही चाहत्यांच्या मनात अजरामर आहे. हा चित्रपट खूप चालला. या चित्रपटात विवेक ओबेरॉयने (Vivek Oberoi) त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम काम केले आहे. हा एक मल्टीस्टारर चित्रपट होता आणि त्यात संजय दत्तसह अनेक स्टार्स होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व लखिया यांनी केले होते. आता त्याने एक मोठा खुलासा केला आहे. या चित्रपटासाठी त्यान जेव्हा विवेक ओबेरॉयला घेतले तेव्हा अनेक निर्माते नाराज झाले होते आणि त्यांनी विवेकच्या नावाला विरोध दर्शवला होता.

अपूर्वाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, जेव्हा मी विवेकला कास्ट केले तेव्हा अनेक निर्मात्यांनी मला फोन करून त्याला रिप्लेस कर, अन्यथा ते माझ्यासोबत काम करणार नाहीत असे सांगितले. पण मी विवेकला माझा शब्द आधीच दिला होता, मग मी माघार कशी घेणार ? यादरम्यान संजय दत्त, सुनील शेट्टी आणि संजय गुप्ता यांनी मला साथ दिली. त्यामुळे खूप लोक मला साथ देत असताना भविष्याची काळजी करण्याची काय गरज आहे, असे मला वाटले. चित्रपट चालला तर हे निर्माते माझ्यासोबत काम करतील, असा मला विश्वास होता .

विवेकला चित्रपटात कास्ट करण्याबाबत अपूर्व म्हणाला की, काहीही असो, विवेक हा प्रतिभावान अभिनेता होता. त्यामुळे त्याला चित्रपटात कास्ट करण्यात काहीच गैर नव्हते. त्याने एखादं काम असं केलं असेल जे करायला नको होतं, तरी त्याचा अर्थ असा होत नाही की तो अभिनेता म्हणून वाईट आहे ना. त्याची अभिनय क्षमता पाहून मी त्याला या चित्रपटासाठी घेतले. मी कधीही माणसाला त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या आधारावर कास्ट करत नाही. तो एक व्यावसायिक आणि सुशिक्षित आहे. मला वाटते की त्याने चांगले काम केले.

 

विवेकही झाला होता निराश

विवेक ओबेरॉयनेही एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते. तो म्हणाला होता की, तो असा काळ होता जेव्हा त्याला इंडस्ट्रीत काम मिळत नव्हते. ‘शूटआउट ॲट लोखंडवाला’ या चित्रपटाने चांगली कमाई केली, विवेकच्या कामाचेही खूप कौतुक झाले, तरीही त्याला वर्षभर काम मिळाले नाही, असे त्याने नमूद केले होते.